‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमधील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. महाराष्ट्रातील घराघरात हा शो आवडीने पाहिला जातो. अनेक विनोदवीरांना हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री शिवाली परबही हास्यजत्रेमुळे प्रसिद्धीझोतात आली.

विनोदी अभिनयाने शिवाली प्रेक्षकांना खळखळून हसवते. हास्यजत्रेतून लोकप्रियता मिळवलेली शिवाली आता हिंदी जाहिरातीत झळकली आहे. महिंद्रा फायनान्सची जाहिरात शिवालीला मिळाली आहे. याचा व्हिडीओ शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या जाहिरातीत शिवालीने कपडे शिवणाऱ्या सामान्य घरातील महिलेची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा>> ३२व्या वर्षी मालिकाविश्वातील अभिनेत्रीने केले Eggs Freeze, म्हणाली “भविष्यात लग्न…”

शिवालीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “वाव शिवा दीदी” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने “क्यूट शिवाली” असं म्हटलं आहे. अनेकांनी कमेंट करत शिवालीचं अभिनंदनही केलं आहे.

हेही वाचा>> “उर्फी जावेद भाजपात गेली काय?” भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले “तिच्या कपड्यांबाबत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती शिवाली पोस्टमधून चाहत्यांना देत असते. अनेकदा शिवाली फोटोही शेअर करताना दिसते. हास्यजत्रेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर शिवाली ‘प्रेम, प्रथा धुमशान’ चित्रपटात झळकली होती. हास्यजत्रेबरोबरच शिवाली ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.