मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसांत अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त स्वत:चे वेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. प्राजक्ता माळी, श्रेया बुगडे, अनघा अतुल, सुप्रिया पाठारे, महेश मांजरेकर, निरंजन कुलकर्णी, तेजस्विनी पंडित अशा लोकप्रिय कलाकारांनी गेल्या काही वर्षांत कपडे व हॉटेल व्यवसायात पदार्पण करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री स्वाती देवल व तिचा पती तुषार यांनी नुकतंच ‘देवल मिसळ’ हे त्यांचं नवीन हॉटेल सुरू केलं आहे. याबद्दल खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने माहिती दिली आहे.

aashay kulkarni exit from muramba serial
काजल काटे, स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची ‘मुरांबा’ मालिकेतून एक्झिट; म्हणाला, “प्रेक्षकहो…”
Vignesh Kamble is now in charge of directing of tejashri pradhan serial Premachi goshta
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा आता ‘यांच्या’ हाती, आधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती होते दिग्दर्शक
Rashmika Mandanna became obsessed with Riya Borse angaaron dance video
Video: रश्मिका मंदानाला ‘या’ मराठमोळ्या चिमुकलीचं लागलं वेड, ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणं गात केलेला डान्स पाहून अभिनेत्री म्हणाली…
Amitabh Bachchan Jaya Bachchan fought like kids
“ते लहान मुलांसारखे भांडायचे,” जया अन् अमिताभ बच्चन डेटवर ‘या’ अभिनेत्रीला न्यायचे सोबत; म्हणाल्या, “त्यांची भांडणं…”
smita shewale Exit From Muramba Serial Meera Sarang Played Janhavi Role
‘मुरांबा’ मालिकेतून स्मिता शेवाळेची एक्झिट, आता जान्हवीच्या भूमिकेत झळकणार ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री
maharashtrachi hasyajatra fame Priyadarshini Indalkar was honored with the Best Comedian Award
“हास्यजत्रेशिवाय हे शक्य नव्हतं…”, प्रियदर्शनी इंदलकरचा सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कारने गौरव, पोस्ट करत म्हणाली…
Triptii Dimri replaces Samantha Ruth Prabhu in allu arjun pushpa 2
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथा प्रभूची जागा घेणार ‘ही’ अभिनेत्री? रणबीर कपूरसह इंटीमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश
Nitish Chavan new serial Lakhat Ek Amcha Dada second promo out
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितेश चव्हाणच्या बहिणी म्हणून झळकणार ‘या’ चार अभिनेत्री, नवा दमदार प्रोमो पाहा

हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या मॅचला पोहोचला हास्यजत्रा फेम गौरव मोरे! फिल्टरपाड्याच्या बच्चनला पाहून नेटकरी म्हणाले, “दादा आज…”

स्वाती देवलची पोस्ट

नमस्कार…! मिसळ महोत्सवाच्या तगड्या आणि अप्रतिम प्रतिसादामुळे आणि अर्थातच तुम्हा प्रेक्षकांच्या, मिसळप्रेमींच्या आशीर्वादामुळे आणि last but not the list ‘राज साहेबांनी’ पाठीवर हात ठेवून मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात आले पाहिजे असा विश्वास आणि प्रोत्साहन दिल्यामुळे ५ एप्रिल रोजी आम्ही आमच्या ‘देवल मिसळ’चे अनावरण लोकाग्रहास्तव आम्ही केले आहे… जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा काही जवळचे मित्रपरिवार मदतीला अक्षरशः धावून आले. किरण नकाशे मनसे सरचिटणीस, प्रकाश दरेकर भाऊ, प्रविणजी भाऊ दरेकर, गोपाळ शेट्टी सर आणि साक्षात स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री श्री पियुष गोयलजी यांनी स्वहस्ते आमच्या आऊटलेटचं अनावरण केलं…ही आयुष्यातील खूप मोठी शाबासकीची थाप आहे असं जाणवलं… आतापर्यंत जे आयुष्यात कष्ट केले त्याचे हे बक्षीस की, अशा पदधतीने थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले… स्वामी समर्थ, दत्त महाराज नेहमीच पाठीशी असतात…त्याची जाणीव होते…पण, खरंच तुषारने एक स्वप्र पाहिलं आणि ते सत्यात उतरवताना त्याची अर्धांगिनी म्हणून उभी राहताना अतिशय अभिमान वाटतो आहे.

माझी नवीन मालिका सुख कळले लेकासह करतांना आणि ‘राणी मी होणार’ या दोन्ही मालिका करतांना आनंद मिळतोय. तुषारचीही नवी inning सुरू होते आहे…हे सगळं करताना आई-वडीलांचे आशीर्वाद आहेत. तुम्हां सर्वांचे भरभरून आशीर्वादाचे मेसेज आलेत…काही personal काही social media वर… तुमचेही असेच प्रेम राहू द्या…संगीतकार दीपक गावंड, संजय कुलकर्णी, भारत गणेशपूरे, chaungi, संचिता गुप्ते, अमोल बावडेकर अशा कलाकार मित्रांनीही भेट दिली.. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.

swati
स्वाती देवल इन्स्टा स्टोरी

हेही वाचा : “आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”

दरम्यान, सध्या कलाविश्वातून देवल जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच अभिनेत्रीची ‘सुख कळले’ ही मालिका येत्या २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात स्वाती स्पृहाबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.