छोट्या पडदा किंवा मालिका विश्वातील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आजही लोकप्रिय आहे. याच मालिकेत सुबोध गुप्ते हे पात्र साकारणारा अभिनेता यश प्रधानला दुखापत झाली आहे. त्याचे फोटोही समोर आले आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको याच मालिकेतील अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने यश प्रधानला झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

“काहीवेळ सगळं काही ठप्प झालं, कारण या माणसाने माझ्या आईच्या घरातील सामान दुसरीकडे नेण्यासाठी मला फार मदत केली. पण त्याचवेळी त्याच्या मनगटाचे हाड मोडले. पण ओम प्रधान आणि अपेक्षा चौकसी मी तुमचे आभार शब्दात व्यक्त करु शकत नाही”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

श्वेताने शेअर केलेल्या या फोटोत यश प्रधानच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला हे फ्रॅक्चर केले आहे.

आणखी वाचा : “श्लोक अल्पाच्या पोटात होता, त्यावेळी…” आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला “तुझं नक्की वय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्वेताने हा फोटो पोस्ट केल्यावर यश प्रधानने त्यावर ‘बाप रे’ अशी कमेंट केली आहे. त्यावर श्वेताने ‘तू बाप रे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच श्वेताच्या या पोस्टवर अनेकांनी यशला ‘लवकर बरा हो’, असा सल्लाही दिला आहे.