‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचल्या दिव्या पुगावकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच सध्या सुरू असलेली दिव्याची ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत दिव्याने साकारलेली मायाळू, सहनशील, भोळी, देवावर श्रद्धा असणारी, जबाबदारीची, कर्तव्याची जाण असणारी आनंदी आता घराघरात पोहोचली आहे. अशात आनंदी म्हणजे दिव्याने तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

अभिनेत्री दिव्या पुगावकरचा १९ डिसेंबर २०२१ मध्ये तिलक समारंभ पार पडला होता. तेव्हापासून दिव्या कधी लग्न करणार? याची चर्चा सुरू झाली. अखेर लग्नाबाबत लवकरच कळेल, असं तिने एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितलं आहे. नेमकं दिव्या लग्नाविषयी काय म्हणाली? जाणून घ्या…

हेही वाचा – माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं काय करतात? अभिनेत्री स्वतः सांगत म्हणाली…

नुकतीच दिव्या ‘राजश्री मराठी शोबझ’च्या ‘खरं की खोटं’ या सगमेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला विचारलं गेलं की, तू लवकरच लग्न करणार आहेस? यावर दिव्या म्हणाली, “हा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत खराही आहे असंही म्हणेण आणि खोटाही आहे असंही म्हणणे. मला लग्न करायचं आहे यात काही शंकाच नाही. पण ते कधी करायचं आहे? हे लवकरच कळेल.”

तसेच अभिनेत्रीला पुढे विचारलं गेलं की, होणाऱ्या नवऱ्याकडून तुझ्याबद्दल काहीच तक्रारी नाहीये? या प्रश्नाचं उत्तर देताना दिव्या म्हणाली, “बऱ्याच आहेत. त्याला जर माझ्या बाजूला इथे बसवलं तर साधारण तो या विषयावर एक-दोन तास बोलले. शूटींगच्या वेळापत्रकामुळे आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवण्यासाठी खूप कमी मिळतो. वरुन मी त्याच्यावर चिडते आणि त्याचं असं असतं की, तुलाच वेळ मिळत नाही म्हणून आपण भेटत नाही. तो सतत मला एक गोष्ट म्हणतं असतो, चिडचिड कमी कर.”

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिमन्युचं अशोक सराफ यांनी केलं कौतुक, अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “अभिमानाचा क्षण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षर घरत आहे. तो एक फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. दिव्या आणि अक्षयची मैत्री फेसबुकवर झाली होती. त्यानंतर काही काळाने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.