scorecardresearch

Premium

Video: “काय मूर्खपणा आहे…,” ‘मन धागा धागा जोडते नवा’तील ‘त्या’ सीनमुळे वैतागले प्रेक्षक, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

या मालिकेतील एका सीनमुळे या मालिकेला प्रेक्षक चांगलंच ट्रोल करू लागले आहेत.

man dhaga dhaga jodte nava

‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या कथेने अल्पावधीतच प्रेक्षकांकडून प्रेम मिळवायला सुरुवात केली. या मालिकेत वरचेवर नवनवीन वळणं येत आहेत. पण आता या मालिकेत दाखवलेल्या एका सीनमुळे प्रेक्षकांनी डोक्याला हात लावला आहे.

या मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर आनंदी ही भूमिका साकारत आहे. तर तिच्या जोडीला अभिनेता अभिषेक रहाळकर या मालिकेत सार्थक या प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील या दोघांच्याही कामाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत असतं. मालिकेमध्ये त्यांना एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम आणि त्यात येणारे अडथळे सगळ्याला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. पण आता या मालिकेतील एका सीनमुळे या मालिकेला प्रेक्षक चांगलंच ट्रोल करू लागले आहेत.

daar ughad baye fame saaniya chaudhari
‘दार उघड बये’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावुक पोस्ट; म्हणाली, “मला…”
Sukh Mhanje Nakki Kay Asta marathi serial
Video: “आता तो गळफास…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका पुन्हा ट्रोल, नवा प्रोमो पाहून वैतागले प्रेक्षक
Tuzech Mi Geet Gaat Aahe
Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो
rubina dilaik pregnancy
टीव्हीवरील संस्कारी सून लवकरच होणार आई, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : “पाठीवर, पदरावर गणपती नसावा…,” ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या लूकवर चाहती नाराज, उत्तर देत म्हणाली…

या मालिकेतील एका एपिसोडची व्हिडीओ क्लिप नुकतीच वाहिनीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली. यामध्ये आनंदी बसलेली असताना चुकून सार्थकच्या हातातून मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडतं असं दाखवण्यात आलं. तर सार्थकच्या हातातून पडलेलं मंगळसूत्र आपल्या गळ्यात आल्यावर आनंदीलाही धक्का बसतो. पण मालिकेत दाखवल्या गेलेल्या या दृश्याला नेटकऱ्यांकडून काहीसा नकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा : “हिला स्वतःची पोरं सांभाळता आली नाहीत आणि…”, ‘आई कुठे काय करते’च्या ट्रॅकमुळे प्रेक्षक हैराण, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं,”काहीही हा डायरेक्टर.” तर दुसरा म्हणाला, “गळ्यात इतक सहज मंगळसुत्र पडत? सहज घालता सुद्धा येत नाही. पण मालिकेत काहीही घडत.” तिसऱ्याने लिहिलं, “गळ्यात मंगळसूत्र पडणे, ताट उडून कुंकू डोक्यात पडणे, दिवा विझणे, देवाच्या हातातून फुल पडणे… याच्या पलीकडेही जा जरा.” तर आणखी एक जण म्हणाला, “किती उल्लू बनवूनं राहीलेतं. असं कधी होतं कां? सार्थक मुद्दामुनं हाताततूनं सुटण्याचें नाटक करतोय असं दिसतचं आहे.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “काय चाललंय…कुणाच्या भांगेत कुंकू पडतं, कोणाच्या गळ्यात मंगळसूत्र. कुठल्या काळात राहता! सगळं छान चाललं असताना माती खातात. तुम्ही दाखवा आम्ही बघतो.” तर आणखी एक म्हणाला, “काय मूर्खपणा आहे!”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man dhaga dhaga jodte nava serial gets troll for its scene rnv

First published on: 27-09-2023 at 17:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×