Mandira Bedi on Not TO Mark Husbands Death Anniversary: दिग्दर्शक व निर्माता राज कौशल यांचे २०२१ साली ५० व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराने राज कौशल यांचे निधन झाले होते. अभिनेत्री मंदिरा बेदी राज कौशल यांची पत्नी आहे. त्यांना दोन मुले आहेत. आता मंदिरा बेदी यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

मंदिरा बेदी यांनी नुकतीच ‘द फुल सर्कल’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज कौशल यांच्या निधनाबाबत वक्तव्य केले. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यासाठी कठीण काळ होता, असे वक्तव्य त्यांनी केले.

पण, मी त्याला एकदाही…

मंदिरा बेदी म्हणाल्या, “राजच्या निधनानंतरचे पहिले वर्ष खूपच कठीण होते. वाढदिवस, दिवाळी, लग्नाचा वाढदिवस असे सगळे कार्यक्रम, सण सगळे कठीण होते. अशा वेळी वाटायचं, की एका खोलीत बसावं, कोणाशीही संवाद साधू नये. खूप रडावं. आणखी रडू शकणार नाही, इतकं रडावं.”

मंदिरा व राज यांनी एका मुलीला दत्तक घेतले आहे. राज कौशल यांचे निधन झाले तेव्हा ताराला दत्तक घेऊन ७-८ महिने झाले होती. त्यामुळे तिच्यावर राज कौशल यांच्या निधनाचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र, त्यांचा मुलगा वीरला वडिलांच्या निधनाचा धक्का बसला. वडिलांच्या निधनानंतर त्याला फार वाईट वाटले होते.

मंदिरा बेदी म्हणाल्या, “वीर खूप रडायचा. पण, मी त्याला एकदाही तू रडू नकोस, असे सांगितलं नाही. मी त्याला सांगायची की, तुला जितकं रडू वाटतं, तितकं रड. त्याच्या दु:खद भावना बाहेर पडल्या पाहिजेत. त्यानंतर तो त्याच्या वडिलांना आनंदानेंआठवू शकतो”, असे म्हणत वडिलांच्या मृत्यूचा मुलावर परिणाम झाल्याचे मंदिरा यांनी सांगितले.

पुढे मंदिरा बेदी यांनी पतीचा स्मृतिदिन पालन करीत नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच, त्याचे कारण काय आहे, यावरदेखील वक्तव्य केले आहे. मंदिरा बेदी म्हणाल्या, “मी एक महिन्यानंतर पूजा केली, एका वर्षानंतर पूजा केली आणि इतर सगळे विधीही केली. जेव्हा एक वर्षानंतर पूजा केली. मला त्याच्या पुण्यतिथीचा दिवस आठवतो. त्या दिवशी मला खूप वाईट वाटते. मला वाटतं की, माझ्या मुलांना ती वाईट आठवण लक्षात राहू नये. तेव्हा मी निर्णय घेतला की, या दिवसाची आठवण केली जाणार नाही. त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे काय आहे? आमच्या आयुष्यातील तो वाईट दिवस आहे.”

पतीच्या आठवणी जपण्यासाठी मंदिरा बेदी राज कौशल यांचा वाढदिवस साजरा करतात. त्याबद्दल मंदिरा बेदी म्हणाल्या, “मी दरवर्षी त्याचा वाढदिवस साजरा करते. मी पूजा करते. त्याच्या मित्रांना जेवणासाठी बोलवते. जेवणात राजचे आवडते पदार्थ असतात. अशा प्रकारे आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंदिरा बेदी अभिनेत्री असण्याबरोबर त्या फॅशन डिझायनरदेखील आहेत.