स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत वैदेहीप्रमाणे हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही नसून मंजुळाच असल्याचं सत्य मोनिकासमोर येणार आहे. त्यानंतर रागाच्या भरात टोकाची भूमिका घेणाऱ्या मोनिकाची समजूत कशी काढायची, हा मोठा प्रश्न मल्हारसमोर पडला आहे. एकीकडे मंजुळा, मोनिका आणि मल्हार यांचं नातं दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत असतानाच आता मालिकेत आणखी एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. साहेबराव असं या नव्या पात्राचं नाव आहे.

साहेबरावला मंजुळासोबत लग्न करायचं आहे. मात्र मंजुळाला साहेबरावासोबत लग्न कधीच मान्य नव्हतं. साहेबरावाने जबरदस्तीने मंजुळाशी साखरपुडा केला. मात्र मंजुळाने गावातून पळ काढून थेट मुंबई गाठली. त्यानंतर तिचा योगायोगाने कामतांच्या घरात प्रवेश झाला. मात्र आता साहेबरावाला मंजुळा कामतांच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तिला मिळवण्यासाठी त्याचे पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत. मंजुळाला मिळवण्यासाठी तो स्वराचं आयुष्यही पणाला लावणार आहे.
आणखी वाचा : फुलंब्रीकर कुटुंबाच्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! २० लाखांमुळे येणार अनोखा ट्विस्ट, ‘एकदा येऊन तर बघा’चा ट्रेलर प्रदर्शित

या मालिकेत साहेबराव हे पात्र अभिनेता अभिजीत केळकर साकारणार आहे. या पात्राच्या हटके नावाप्रमाणेच त्याचा लूकही हटके असणार आहे. अभिजीतने याआधी स्टार प्रवाहच्या पुढचं पाऊल आणि तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेतही लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यानंतर आता तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत झळकणार आहे.

आणखी वाचा : “ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं…”, सिडनी दौऱ्यावर जाणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीतच्या एंट्रीमुळे या मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यात साहेबरावाचा मंजुळाबरोबर लग्न करण्याचा मनसुबा यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये स्पष्ट होणार आहे. तसेच निरागस स्वराचं आयुष्य पुन्हा एकदा धोक्यात आल्याने नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहे.