मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनयाची छाप पाडणाऱ्या अमोल कोल्हेंना प्रेक्षकांनी ऐतिहासिक भूमिकेत विशेष पसंती दिली. त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो अथवा संभाजी महाराज असो. या भूमिकांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय राजकारणाच्या बरोबरीने ते निर्मिती क्षेत्रात सक्रीय आहेत.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केल्यानंतर ते आता एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. अमोल कोल्हे आता ‘प्रेमास रंग यावे’ या नव्या मालिकेची निर्मिती करणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यात सारिका नवाथे, अमिता कुलकर्णी, अभिजीत चव्हाण आणि गौरी कुलकर्णी यांसारखे कलाकार दिसणार आहेत. अमोल कोल्हेचा जगदंब क्रिएशनने निर्मिती सांभाळली आहे. २० फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता सन मराठीवर प्रक्षेपित होणार आहे

रसोडे में कौन था?’ फेम यशराज मुखाटेबरोबर अफेअरच्या चर्चांवर अखेर वैदेही परशुरामीने सोडलं मौन; म्हणाली…

या मालिकेच्या प्रोमोत अक्षरा आणि सुंदर यांची प्रेमकथा दाखवली आहे. अक्षरा ही एक आदर्श मुलगी आहे जिला तिच्या सर्वांना आनंदात ठेवायला आवडते. अक्षराच्या कुटुंबाला तिचा अभिमान आहे. अक्षराने तिची चांगली काळजी घेणाऱ्या मुलाशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे, सुंदर हा त्याच्या गावचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कुटुंबाला एक सून हवी आहे जी त्यांच्या दर्जाशी आणि श्रीमंतीशी जुळेल. त्यांचे लग्न कसे होणार आणि त्यांच्या आयुष्यात काय घडते हे लवकरच कळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेच्या निर्मितीबरोबरच ‘शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोगदेखील करतात. नुकताच या महानाट्याचा प्रयोग नाशिक येथे पार पडला. या नाटकात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा महाराणी येसूराणी यांची भूमिका साकारत आहे.