Aai Kuthe Kay Karte: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. पण, आता मालिकेचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मालिकेच्या निरोपाचे अंतिम भाग सुरू झाले आहेत. त्यानिमित्ताने ‘आई कुठे काय करते’मधील कलाकार प्रेक्षकांना हे अंतिम भाग पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. तसंच या मलिकेने आपल्याला काय दिलं? याविषयी सांगत आहेत.

नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अप्पा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अप्पांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेने त्यांना काय दिलं? याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले, “नमस्कार, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने मला काय दिलं? थोडक्यात आईनं मला काय दिलं? आज महाराष्ट्रामध्ये फिरतो तेव्हा मला अप्पा म्हणून हाक मारतात.”

हेही वाचा – Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

“मी जिथे जिथे जातो तिथे बायका, मुलं, माणसं सगळे मला भेटतात. प्रेमाने भेटतात, माझ्या पाया पडतात आणि म्हणतात, प्रत्येक घरामध्ये अप्पासारखा सासरा असायलाच हवा. सूनेच्या पाठीशी खंबीरपणे बाप्पासारखं कसं उभं राहायचं, हे आम्हाला अप्पांनी शिकवलं. हा आदर्श, हा आदर, हे प्रेम हे सगळं मला ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे मिळालं. हा म्हणता म्हणता शेवटचा टप्पा जवळ आला आहे. म्हणून बघूया या मालिकेच्या निरोपाचे अंतिम भाग,” असं अभिनेते किशोर महाबोले म्हणाले.

हेही वाचा – Video: शुभमंगल सावधान! भगरे गुरुजींच्या मुलाचं थाटामाटात पार पडलं लग्न, पारंपरिक पद्धतीने झाला गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

दरम्यान, डिसेंबर २०१९मध्ये सुरू झालेल्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा प्रवास लवकरच थांबणार आहे. पाच वर्षांच्या प्रवासात मालिकेत अनेक ट्विस्ट आले. काही ट्विस्टने टीआरपी वाढवला. पण काही ट्विस्ट प्रेक्षकांसाठी रटाळवाणे होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ‘आई कुठे काय करते मालिका बंद करा’, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटतं होत्या. अखेर आता मालिका ऑफ एअर होतं आहे.

हेही वाचा – Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.