मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. जयंत सावरकर यांचे सोमवार २४ जुलैला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. जयंत सावरकरांच्या निधनानंतर अभिनेते समीर चौघुलेंनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
समीर चौघुलेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी जयंत सावरकर यांचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा : Video : “माणसं नेटवर्कमध्ये आहेत, पण कोणी…” जयंत सावरकरांचा आईसोबतच्या संभाषणाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
समीर चौघुलेंची पोस्ट
“दिग्गज रंगकर्मी नटश्रेष्ठ अण्णा सावरकर गेले…तरुणांना ही लाजवेल अशी एनर्जी असणारा सच्चा रंगकर्मी गेला….नागपूरच्या नाट्य संमेलनात आम्ही दोघे रूम पार्टनर होतो….”समीर तू बिनधास्त रात्री उशिरा पर्यंत टिव्ही बघ हं….मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही..मला कुठे ही झोप लागते” अस म्हणून निमिषार्धात आमच्या वयातील दरी नाहीशी करून कोणत्या ही पिढीशी जुळवून घेणारे अण्णा त्या क्षणी प्रेमात पाडून गेले….सतत दुसऱ्याचं कौतुक करण्याचा स्वभाव आणि त्यांच्या संगमरवरी कारकिर्दीचे किस्से यात पहाट कधी झाली हेच कळलं नाही…मी सतत सांगतोय “अण्णा तुम्ही झोपा..पण छे हा तरुण ऐकतोय कसला !….साधारणतः मैफल काही लोकांची असते..पण त्या रात्री मात्र रसिक फक्त “मी” होतो हे माझे भाग्य….असे हे आमचे दोस्त अण्णा…..तुमच्या सारख आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे घेऊन जगता आलं पाहिजे हो…अण्णा…आम्ही तुम्हाला खूप मिस करू…जिथे असाल तिथे मस्तच असाल”, असे समीर चौघुलेंनी यात म्हटले आहे.
दरम्यान जयंत सावरकर यांना ‘अण्णा’ या नावाने सर्वजण हाक मारायचे. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या प्रगल्भ अभिनयाचा ठसा उमटवला.
वयाच्या विसाव्या वर्षी, १९५४ सालापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले.