गणेशोत्सवासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. यंदा पुण्यात गणेशोत्सवात रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून अभिनेते वैभव मांगले यांना ओळखलं जातं. ते सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “बुकींगची घट, निर्मात्यांशी वाद अन्…” वैभव मांगलेंनी सांगितलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक सोडण्याचे खरं कारण, म्हणाले “मुलं मोकळी असतात तेव्हा…”

या पोस्टमध्ये त्यांनी एका वृत्तपत्राचा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी “हे काय चाललंय काय ??…आणि मग सवाई महोत्सवाला 10 वाजे पर्यंतच का ????” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैभव मांगलेंच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत समर्थन करताना दिसत आहेत. “कधीकधी वाटतं आपण खरंच स्वतंत्र झालोत का?”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “सवाई मध्ये तुम्ही धांगड धिंगा करणार असाल तर देतील कि त्याला पण परवानगी…” असे म्हटले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.