‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे. गेले काही महिने हा शो प्रेक्षकांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात असलेली ‘चिंची चेटकीण’ सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच या कार्यक्रमाला अभिनेते वैभव मांगले यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना ‘शाकाल’ या नावाने आवाज दिल्यामुळे ते भयंकर संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वैभव मांगले हे कायमच लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात चिंची चेटकीण ही भूमिका साकारली होती. वैभव मांगले यांनी अभिनय आणि दमदार संवादाने हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी साकारलेली ‘चिंची चेटकीण’ तुफान गाजली. केवळ लहान मुलांनी नव्हे, तर मोठ्यांनीही या बालनाटयाला अप्रतिम प्रतिसाद दिला. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी या नाटकातून एक्झिट घेतली. सध्या ते ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमात झळकत आहेत.
आणखी वाचा : “चांगल्या मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळाल्याने…” रितेश देशमुख बॉलिवूडबद्दल स्पष्टच बोलला

नुकतंच झी मराठीने या कार्यक्रमातील एक प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात वैभव मांगले यांचा डबल रोल पाहायला मिळत आहे. यावेळी वैभव मांगले यांनी ‘टाइमपास’ चित्रपटातील माधवराव लेले या भूमिकेत मंचावर एंट्री केली. यावेळी त्यांनी ‘चिंची चेटकीणी’ची खिल्ली देखील उडवली. “काय ते केस, काय ते नाक, समदं ओकेमध्ये आहे एकदम..”, असे वैभव मांगले म्हणाले.

त्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या संदीप पाठक याने वैभव मांगलेंबरोबर बोलताना “एक काम करा शाकाल सर…” असे म्हटले. त्याने ‘शाकाल’ म्हटलेले वैभव मांगले यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी लगेचच आवाज चढवत ‘एक मिनिट…’ असे म्हटले. यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण चकित झाले. “माझं नाव शाकाल नाही. तो फालतू दगडू त्याने मला हे नाव ठेवलेलं आहे. माझं नाव आहे माधवराव लेले…”, असे म्हटले.

आणखी वाचा : आलियाचा हात सोडून आईबरोबर चालणाऱ्या रणबीरवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “बायको गरोदर असूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मजेशीर व्हिडीओ असून यावेळी मंचावर धमाल-मस्ती पाहायला मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंटही केल्या आहेत. तर काहींनी या व्हिडीओला पसंतीही दर्शवली आहे.