मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या आपल्या अभिनयाबरोबरच ट्रेंडिंग रील्समुळे चर्चेत असतात. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपालीचं पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ऐश्वर्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. त्या सातत्याने त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात, इतकंच नाही तर त्या आरोग्यासंबंधित सल्लेही चाहत्यांना देतात.

ऐश्वर्या नारकर खूप सुंदर दिसतात, त्यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. ऐश्वर्या नारकर खूपदा इन्स्टाग्राम लाइव्ह किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘आस्क मी एनिथींग’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधतात. त्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. खूपदा त्या इन्स्टाग्रामवर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया देतात. फोटो किंवा रील्सवर येणाऱ्या कमेंट्सना त्या उत्तर देतात. आता नुकतंच त्यांनी ‘आस्क मी एनिथींग’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

एका चाहत्याने ऐश्वर्या नारकर यांची जन्मतारीख विचारली. त्या चाहत्यांना अभिनेत्रीने जन्मतारीख सांगितली. ८ डिसेंबर १९७४ ला ऐश्वर्यांचा जन्म झाला होता.

Aishwarya Narkar age
एश्वर्या नारकर यांची पोस्ट

एका चाहत्याने ऐश्वर्या नारकर यांना तुमचं वय किती असं विचारलं. त्यावर त्यांनी ४९ असं लिहीलं आणि हे नोट करून ठेवा असं त्या म्हणाल्या.

Aishwarya Narkar age
एश्वर्या नारकर यांची पोस्ट

यानंतर एका चाहत्याने त्यांना त्या मुंबईत कुठे राहतात, असं विचारलं. त्यावर त्यांनी बोरीवली असं उत्तर दिलं.

Aishwarya Narkar Borivali
एश्वर्या नारकर यांची पोस्ट

यानंतर त्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला, त्याचं त्यांनी उत्तर दिलं. ‘तुम्ही वैश्यवाणी आहात ना, तुमचं गाव कोणतं?’ असं एका युजरने विचारलं. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी त्यांचा व अविनाश नारकरांचा एक फोटो शेअर करत ‘भुईबावडा’ असं उत्तर दिलं.

Aishwarya Narkar village
Aishwarya Narkar village

या सेशनमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी इतरही काही प्रश्नांची उत्तरं दिली. तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता आहे? असं एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं. त्यावर त्यांनी ‘पिंजरा’ हा आवडता चित्रपट असल्याचं सांगितलं. ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या आवडत्या मराठी गाण्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ असं उत्तर ऐश्वर्या नारकरांनी दिलं.

ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिनेसृष्टीत बऱ्याच वर्षांपासून सक्रिय असलेल्या ऐश्वर्या नारकर यांना एका चाहत्याने त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल विचारलं. तसेच आवडत्या रंगाबद्दलही प्रश्न विचारलं. ऐश्वर्यांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली. ऐश्वर्या नारकरांचे आवडते अभिनेते अरुण सरनाईक आहेत, तर त्यांना पांढरा रंग खूप आवडतो, असं त्यांनी स्टोरीमध्ये चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.