अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर, हे सध्या मराठी सिनेसृष्टीतील कायम चर्चेत असलेलं कपल. नारकर कपलची जितकी कामाची चर्चा असते तितकीच त्यांच्या व्हिडीओची चर्चा असते. सोशल मीडियावर अविनाश व ऐश्वर्या नारकर खूप सक्रिय असतात. दररोज चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात.

अनेकदा दोघांना ट्रोल केलं जात. पण या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर नेहमी सडेतोड उत्तर देताना दिसतात. नारकर कपलच्या डान्स व्हिडीओमध्ये विशेष म्हणजे अविनाश यांची एनर्जी व डान्स तरुणाईला लाजवेल अशी असते. त्यांचा डान्स हा नेहमी अनेकांना आवडतो. अशातच ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्या डान्स व्हिडीओविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “एका कलाकाराशी लग्न करताना…”, ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या लग्नाला झाली सहा वर्षे, खास पोस्ट करत म्हणाला…

‘रत्न मराठी मीडिया’शी संवाद साधताना ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “अवी जास्त उत्साही आहे. त्याला खूप या गोष्टी आवडतात. त्याला नाचायला, एन्जॉय करायला खूप आवडतं. तो लोअर परळचा आहे. त्यामुळे त्याचं तिकडंच रक्त आहे. त्या सगळ्या एनर्जीमधला तो आहे.”

पुढे ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मधल्या काळात खूप गंभीर नाटकं केली किंवा अशा पद्धतीचं धतिंग त्याला लोकांसमोर करताच आलं नाही. जे तो खूप एन्जॉय करतो आणि आता त्याला हे टूल मिळालंय. इथे मी मजा करू शकतो त्यामुळे तो पूर्णवेळ त्यामध्ये सक्रिय असतो. त्याला कधी अचानक सांगितलं तरी तो तयार असतो. त्याच्यासाठी तो सराव करतो. त्याला ते परफेक्ट हवं असतं. माझं कधी चुकलं तर लगेच बोलतो असं नाहीये. शाळेत आपण स्नेहसंमेलनाचा (गॅदरिंग) सराव करतो, तसंच आम्ही बऱ्याच वेळा सराव करतो. तो वेळही छान जातो. मुळात त्याला जनसंपर्क ठेवायला आवडतो. त्यामुळे मला असं वाटतं की, हे माध्यम कसं वापरायचं? कसा लोकांशी संवाद साधायचा? हे जेव्हापासून त्याला कळलं तेव्हापासून त्याची मजा आहे.”

हेही वाचा – Video: मराठमोळ्या मृणाल ठाकूरला आईने डब्यात दिल्या लाह्या अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसंच ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.