‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे. नुकतंच अपूर्वाने तिच्या या पात्रासाठी तिला काय पूर्वतयारी करावी लागली, याबद्दलचा खुलासा केला आहे.

नुकतंच अपूर्वा नेमळेकरने ‘टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रेमाची गोष्ट या मालिकेसाठी तिला काय तयारी करावी लागली, याबद्दलचा खुलासा केला. त्यावेळी तिने रात्रीस खेळ चाले या मालिकेबद्दलही भाष्य केले.
आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

“रात्रीस खेळ चाले या मालिकेत मी शेवंता हे पात्र साकारलं होतं. त्यासाठी मला वजन वाढवण्यास सांगितले होते. त्यानुसार मी माझे वजन वाढवले. शेवंता या पात्रासाठी केस काळे करणेही गरजेचे होते, तेही मला करावे लागले”, असे अपूर्वा म्हणाली.

“माझ्या केसांचा रंग हा तपकिरी होतो. सावनीच्या भूमिकेसाठी मी सर्वात आधी माझे वजन कमी केले. तसेच मी माझ्या केसांचा रंगही बदलला. प्रेक्षकांना सावनीचे पात्र आवडावे, यासाठी मी त्यावर बरीच मेहनत घेत आहे. मी कायमच मला मिळालेली पात्र साकारण्यासाठी त्याच्या लूकवर लक्ष केंद्रीत करत असते”, असेही अपूर्वाने सांगितले.

आणखी वाचा : नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट’ही मालिका सातत्याने चर्चेत आहे. या मालिकेतून तेजश्रीसह अपूर्वानेही दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत अपूर्वा नेमळेकर ही सईच्या आईची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे.