मराठमोळ्या अभिनेत्री अतिशा नाईक यांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलंय. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत त्यांनी इंदुची भूमिका साकारली होती. मालिकेतील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्या इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.

नाना पाटेकरांनी अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न, बँकेत होत्या त्यांच्या पत्नी; असं काय झालं की वेगळे राहतात दोघं, जाणून घ्या

अतिशा यांना एक मुलगी आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या मुलीकडे लोक कसे वाईट नजरेने बघत होते, याचा खुलासा केला. इट्स मज्जाला दिलेल्या मुलखातीत अतिशा म्हणाल्या, “मी मुलीच्या कोणत्याच गोष्टीत लुडबूड करत नाही. मी तिला म्हणते तुला जे वापरायचंय ते तू वापर. कॅरी करू शकतेस का? तर बघ. कॅरी करू शकत नसशील तर ती तुझी जबाबदारी आहे. मग कोणी छेड काढली, जर तुम्हाला त्रास दिला, तर त्याचा प्रतिकार करण्याची ताकद आहे का? ती असेल तर कशातही तुम्ही कंफर्टेबल राहू शकता.”

“मी वाईट आई आहे”, मुलीच्या पहिल्या घटस्फोटाला नीना गुप्ता स्वतःला मानतात जबाबदार; मसाबाने केला खुलासा

पुढे त्या म्हणाल्या, “मी माझ्या मुलीबरोबर फिरताना अनेकदा बघितलंय की तिच्याकडे पाहताना अशी लाळ गळतीये लोकांची. असं जाहीरपणे बोलल्याबद्दल सॉरी. पण खरंच घडलं होतं. एकदा तर मी एकाला बोलले होते, असे समोर बघ खड्डा आहे, मागे तिच्याकडे बघतोय या नादात पडशील, असं मी बोलले होते. म्हणून मी फक्त मला सांगू शकते इतर कुणालाही म्हणू शकत नाही की तू काय कर, काय घाल किंवा काय करू नकोस. कारण तो त्यांचा निर्णय आहे.”

View this post on Instagram

A post shared by Atisha Naik (@atishanaikofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण काय घालायचं, कसं राहायचं याबद्दलचा आपला निर्णय आपण घेतो, तर मुलगी स्वतंत्रपणे तिचा निर्णय घेते असंही अतिशा यांनी नमूद केलं.