मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहोचली. या मालिकेत जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तिच्या लग्नाची चर्चाही रंगताना दिसते; एवढंच नाही तर तिचा घटस्फोटही झाला आहे असे अनेकांना वाटते. नुकत्याच एका मुलाखतीत जुईने तिचे लग्न व घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य केले आहे.

नुकतेच जुईने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. जुई म्हणाली, “अनेक फोटोंमध्ये मी मंगळसूत्र घातलेली दिसून येते. काही लोकांना कळून येत नाही की तो फोटो मी ऑनसेट काढला आहे की बाहेर काढला आहे. ९० टक्के मी ऑनसेट असते किंवा कुठे प्रमोशनला गेले तर ते मंगळसूत्र लूकचं असतं. त्यामुळे लोकांना वाटतं माझं लग्न झालं आहे. एवढंच नाही तर मला दोन मुलं आहेत असेही अनेकांना वाटतं.”

जुई पुढे म्हणाली, “गूगलवरही अशा बर्‍याचश्या गोष्टी आहेत, ज्या अशा अफवांना खतपाणी घालतात. त्यामुळे ज्या गोष्टी खऱ्या नसतात त्यांनाही लोक खरं मानतात. त्यामुळेच लोक मला विचारतात, तुझं लग्न झालं आहे का? की तुझा घटस्फोट झाला आहे? की तुला मंगळसूत्र घालायची लाज वाटते.

हेही वाचा- लग्नानंतर पियुषने पत्नी सुरुचीसाठी बनवला खास पदार्थ; फोटो शेअर करीत अभिनेत्री म्हणाली….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली कल्याणी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तसेच ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुझविन सख्या रे’ या मालिकांमधील जुईची भूमिका चांगलीच गाजली. मालिकांव्यतिरिक्त जुईने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे.