Marathi Actress Weight Loss Story : अलीकडच्या काळात मनोरंजन विश्वात सक्रिय असणारे अनेक सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिची वेट लॉस जर्नी चाहत्यांना सांगितली आहे.

या लोकप्रिय अभिनेत्रीने वर्षभरात जवळपास १७ किलो वजन कमी केलं आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे काजल काटे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे काजल प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने शेफाली ( प्रार्थना बेहेरेची मैत्रीण ) ही भूमिका साकारली होती. यानंतर काजलने ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुरांबा’मध्ये देखील काम केलं. सध्या अभिनेत्री तिच्या वेट लॉस जर्नीमुळे चर्चेत आली आहे.

काजलने वजन कमी करण्याआधी ती कशी दिसायची आणि सध्या ती कशी दिसतेय याचे फोटो शेअर करत वजन कमी करण्यावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री म्हणते, “हा प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नव्हता. हा प्रवास स्वत:मधील भीती, शंका आणि मला मागे ठेवणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होण्याचा होता. मी फक्त कॅमेऱ्यासाठी वजन कमी केलेलं नाही तर, आरशात पाहिलेल्या व्यक्तीसाठी ( स्वत:साठी ) वजन कमी केलं. खूप मोठी स्वप्न होती आणि माझं मन समाधानी नव्हतं. मनात जेव्हा-जेव्हा ‘नाही’ करू शकणार अशी भावना आली तेव्हा मी अधिक कठोर संघर्ष केला. या सगळ्यामुळे हे परिवर्तन झालं आहे. हा केवळ शारीरिक बदल नाहीये…शिस्त, विश्वास आणि तुमच्या मनात असेल तर तुम्ही स्वत:च्या आयुष्याची गोष्ट नव्याने लिहू शकता याचा पुरावा आहे.”

“मी कृतज्ञ आहे की मला या संपूर्ण प्रवासात माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली, त्याने माझ्यात विश्वास निर्माण केला. त्याच्यासह या सगळ्यात माझी न्यूट्रिशनिस्ट अंकिता घागने देखील मदत केली. अंकिता, खूप खूप धन्यवाद! अजून हा प्रवास पूर्ण झालेला नाही. मला खात्री आहे की मी माझं ध्येय नक्की साध्य करेन. १७.६ किलो वजन कमी केलंय आणि आता पुढेही हा प्रवास असाच सुरू राहील…ही फक्त सुरुवात आहे. १० मे २०२४ ते १० मे २०२५…” अशी पोस्ट शेअर करत काजलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kajal Kate Kadam (@kajal_kate_k)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काजलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीच्या पतीचं नाव प्रतिक कदम असं आहे. तिचा पती मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.