गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकारांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. ऋतुजा बागवे, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता माळी, राधा सागर अशा काही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांमध्ये नवीन घर घेतलं. तर आता या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे.

आणखी वाचा : “तू लग्न कधी करत आहेस?” अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…

सी अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून तिने स्वतःची ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. आता तिने काही फोटो शेअर करत नवीन घरात गृहप्रवेश केल्याचं चाहत्यांना सांगितलं.

हेही वाचा : हिरवीगार झाडं, डोंगर अन्…; ‘असा’ आहे ऋतुजा बागवेच्या नवीन घरातून दिसणारा व्ह्यू , फोटो पाहून व्हाल थक्क

मीराचं हे नवीन घर पुण्यात आहे. नुकतीच त्यांनी या घराची वास्तुशांत केली. या वेळेचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. यामध्ये ती तिच्या कुटुंबीयांबरोबर गृहप्रवेश करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “जोशींना त्यांचं नवीन निवासस्थान सापडलं आहे. नव्या सुरुवातीस, कुटुंबासोबत नवीन घराचा आनंद साजरा करत आहोत.” तर आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत सर्वजण तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.