Neha Shitole : कोलकाता येथील आर. जी. आर वैद्यकीय महाविद्यालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची निर्घुण हत्या केल्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. बॉलीवूड कलाकारांसह मराठी कलाकारही या घटनेवर व्यक्त झाले आहेत. या घटनेनंतर देशभरातील लोक रस्त्यावर उरतले असून, सध्या सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अभिनेत्री नेहा शितोळेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं परखड मांडलं होतं. नेहाप्रमाणे जिनिलीया देशमुख, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर, शिवानी सुर्वे, अनघा अतुल, हेमंत ढोमे, मंजिरी ओक, मनवा नाईक अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी कोलकाता येथे घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला होता. या सगळ्या कलाकारांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे. चुकीची कमेंट करत मुलींवरच प्रश्न उपस्थित करणाऱ्या या नेटकऱ्याला अभिनेत्री नेहा शितोळेने चांगलंच सुनावलं आहे. या कमेंटचा स्क्रीनशॉट नेहाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : 70th National Film Awards : राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘वाळवी’ने मारली बाजी! तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला…; पाहा विजेत्यांची यादी

नेहा शितोळेने नेटकऱ्याला सुनावलं

“एका माणसामुळे पूर्ण पुरुष जातीला वाईट बोलतात लोक… मॉडर्न मुलींनी पूर्ण कपडे घातले तर चांगलं होईल” असं या नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे. यावर स्पष्ट उत्तर देत नेहा शितोळे ( Neha Shitole ) म्हणाली, “डॉक्टर पूर्ण कपड्यांमध्ये आणि डॉक्टरच्या गणवेशात होत्या सर… त्या अभ्यास करत होत्या बसून आणि पुरुष जातीला का बोलावं लागतंय हे तुमची कमेंट वाचून तुम्हालाच कळेल.”

नेहा शितोळेने या कमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत यावर “काय बोलायचं?” असं कॅप्शन याला दिलं आहे. अभिनेत्रीशिवाय या नेटकऱ्याला आणखी एका युजरने मानसिकता बदला असं कमेंटला उत्तर देत थेट सांगितलं आहे.

हेही वाचा : हुबेहुब राज ठाकरे, तेजस्विनी पंडित अन् शूटिंगचा सेट; अभिनेत्री आणणार मनसे प्रमुखांवर चित्रपट? ‘तो’ फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
neha shitole
अभिनेत्री नेहा शितोळे ( Neha Shitole )

दरम्यान, नेहा शितोळेच्या ( Neha Shitole ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने आजवर अनेक मराठी चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात नेहा सहभागी झाली होती. या शोची ती उपविजेती ठरली होती. याशिवाय नेहाने काही दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी संवादांसाठी स्क्रिप्ट लेखन देखील केलं आहे.