दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारत देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीपासून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक पोस्ट शेअर करत स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता माळी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच प्राजक्ताने आपला राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्राजक्ताने साने गुरुजींची एक कविताही शेअर केली आहे.
आणखी वाचा : प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट, म्हणाली “तो मुलगा…”
प्राजक्ता माळीची पोस्ट
“बलसागर भारत होवो..
विश्वात शोभून राहो..!वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन
या बंधू सहाय्याला हो.. !या उठा करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरूषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो..!
– साने गुरूजीभारतावर किती प्रेम आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. गेल्या कित्येक जन्मांची पुण्याई की या महान भारतात जन्मले. भारताच्या उत्कर्षासाठी झटत राहू, हीच प्रतिज्ञा करू.
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो. जय हिंद.. वंदे मातरम् ।”, असे कॅप्शन प्राजक्ता माळीने या पोस्टला दिले आहे.
आणखी वाचा : आधी पुण्यात घर, आता मुंबईजवळ खरेदी केले फार्महाऊस; प्राजक्ता माळीचे स्वप्न झाले साकार
दरम्यान प्राजक्ता माळीच्या या पोस्टखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.