अभिनेत्री प्राजक्ता माळीने अलिकडेच भावाच्या लग्नातील बरेच फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले. चित्रीकरणामधून वेळ काढत ती भावाचं लग्न एण्जॉय करताना दिसली. कुटुंबाबरोबर बराच वेळ एकत्रित घालवला. आता प्राजक्ता आपल्या कामाला लागली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाव्यतिरिक्त प्राजक्ता तिच्या इतर कामांमध्येही व्यग्र असते. आताही तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यानचा प्राजक्ताने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून…” वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’ प्रसंग

प्राजक्ताला अभिनयाबरोबरच नृत्य कौशल्याचीही आवड आहे. काही कार्यक्रमांमधून प्राजक्ता नृत्य करतानाही दिसून आली. आताही तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. इतकं नव्हे तर तिने यावेळी नृत्य सादर केलं. या लाईव्ह कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते.

प्राजक्ता हा व्हिडीओ शेअर करताना म्हणाली, “खूप दिवसांनी रंगमंचावर नृत्य सादर केलं. सुमारे ६ ते ७ हजार प्रेक्षक होते. सुभाष नकाशे सरांची नृत्यसंरचना, आई भवानीचा गोंधळ. सगळंच मनासारखं होतं. बरं वाटलं.”

आणखी वाचा – Video : पार्टीत दारूने भरलेले ग्लास, टेबलावर चढून नाचली अन् आता बिकिनी परिधान करत केला डान्स, सुप्रसिद्ध गायिकेचे व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ताने गोंधळ हा नृत्य प्रकार सादर केला. तिचं हे नृत्य खरंच अंगावर काटा आणणारं होतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तर प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिचं व तिच्या नृत्याचं कौतुक केलं आहे. तसेच काही तासांमध्येच तिला हजारो व्ह्युज मिळाले आहेत.