scorecardresearch

“कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून…” वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’ प्रसंग

अभिनेत्री सायली संजीव तिच्या बाबांची आठवण सांगताना भावूक

“कर्करोगाच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून…” वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’ प्रसंग
अभिनेत्री सायली संजीव तिच्या बाबांची आठवण सांगताना भावूक

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सायली संजीवचंही नाव आवर्जुन घेतलं जातं. सायली तिच्या कुटुंबियांच्या फार जवळ आहे. गेल्याच वर्षी ३० नोव्हेंबरला तिच्या वडिलांचं निधन झालं. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. दोघांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं होतं. तिचा क्रश कोण? इतकंच नव्हे तर वडिलांचा क्रश इथपर्यंत या दोघांमध्ये चर्चा रंगायच्या. आता एका मुलाखतीदरम्यान सायलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आणखी वाचा – Video : “हिडीस बाई, मी नाही त्यातली अन् कडी लाव…” टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर व तेजस्विनी लोणारीत जुंपली, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री सुलेखा तळवर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सायली तिच्या बाबांबाबत भरभरून बोलत होती. सुलेखा यांनी तिला तुझ्या बाबांची एखादी आठवण आम्हाला सांग असं म्हटलं. यावर सायलीने त्यांच्या निधनापूर्वीची एक आठवण सांगितली.

सायली म्हणाली, “बाबांबरोबरच्या असंख्य आठवणी आहेत. पण बाबांचं निधन होण्यापूर्वीची मी एक आठवण सांगते. एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते हे मला यावरून कळालं. बाबांचा कर्करोग बरा व्हावा म्हणून मी त्यांच्यावर उपचार करत होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा होती.”

आणखी वाचा – अंतर्वस्त्र, टॉवेल गुंडाळत मानसी नाईकच्या नवऱ्याने केलं होतं न्यूड फोटोशूट, व्हायरल फोटोंमुळे होता चर्चेत

“त्यांच्यावर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते. मी गाडी खरेदी करू शकले नाही हे बाबांच्या डोक्यात होतं. बाबांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली. त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हतं. तरीही ते उठून बसले. आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी साईन केली. सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली. काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली.” सायली संजीवचं तिच्या बाबांवर प्रचंड प्रेम आहे हे तिच्या बोलण्यामधून वेळोवेळी दिसून येतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या