मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहेत. सध्या प्राजक्ताही करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानंतर तिने कर्जतमधील तिच्या नव्या फार्महाऊसची झलकही दाखवली होती. आता तिने तिच्या आवडत्या ठिकाणाबद्दलचा खुलासा केला आहे.

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हींगचा आश्रम पाहायला मिळत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

प्राजक्ता माळीची पोस्ट

आयूष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल.

Passionately dispassionate..
(कधीही आश्रमवासी होऊ शकते..) गुरूतत्व #सानिध्य #ध्यान #योगी #शांती
advance course..
detox mode on..
Phone will be off, असे प्राजक्ताने म्हटले आहे.

आणखी वाचा : आधी पुण्यात घर, आता मुंबईजवळ खरेदी केले फार्महाऊस; प्राजक्ता माळीचे स्वप्न झाले साकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानतंर तिने कर्जतमध्ये एक फार्म हाऊस खरेदी केले. तिचे हे फार्महाऊस कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. तिने याचे काही फोटोही पोस्ट केले होते.