‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २३ डिसेंबरपासून नवी मालिका सुरू होत आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता अभिजीत आमकर आणि अभिनेत्री शर्वरी जोग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका प्रसारित होणार आहे. याच मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे.

आठ वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ची एक मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील विलास आणि राधाची जोडी सुपरहिट झाली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची पत्नी नीलकांती पाटेकर झळकल्या होत्या. आता ही मालिका कोणती असेल हे लक्षात थोडं आलंच असेल. या मालिकेचं नाव होतं ‘गोठ’. याच ‘गोठ’ मालिकेतील राधा म्हणजेच अभिनेत्री रुपल नंद ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेत्री रुपल नंद ‘गोठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर रुपल वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी बंद झालेली मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ यामध्ये रुपल झळकली होती. त्यानंतर आता अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत रुपल कोणत्या भूमिकेत झळकणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिका आणि अभिमन्यू पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे जाणून घ्या…

‘तू ही रे माझा मितवा’ या ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत अभिजीत आमकर, शर्वरी जोग, रुपल नंदसह आशुतोष गोखले, मधुरा जोशी पाहायला मिळणार आहेत. तसंच अजून बरेच कलाकार झळकणार आहेत.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधीने ‘या’ अभिनेत्यासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “३३ वेळा लिहून, खोडून…”

View this post on Instagram

A post shared by @kavyaparth_fans

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ अलीकडेच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिका सुरू झाली आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय अंदलकर यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.