scorecardresearch

“तुझं माझं नेटवर्क…” ऋतुजा बागवेच्या बोल्ड फोटोवर ओंकार राऊतची कमेंट, अभिनेत्री म्हणाली “सर्व्हर…”

ओंकार आणि ऋतुजा यांच्यातील संभाषणाचे फोटो व्हायरल होत आहेत.

rutuja bagwe onkar raut
ऋतुजा बागवेच्या बोल्ड फोटोवर ओंकार राऊतची कमेंट

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने सिनेसृष्टीत स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमधून ती प्रसिद्धीझोतात आली. नाटक, मालिका, चित्रपटांतून अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. नुकतंच ऋतुजाने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यावर अभिनेता ओंकार राऊतने केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.

ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्याबरोबर तिने गळ्यात छान नेकलेसही घातला आहे. यावेळी फोटोशूट करताना ऋतुजा ही हातात हिल्स घेऊन उभी असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत

या फोटोला कॅप्शन देताना ऋतुजाने दोन हार्ट इमोजी शेअर केले आहेत. ऋतुजाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार राऊतने केलेल्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ओंकार राऊतने ऋतुजाच्या फोटोवर कमेंट करत ‘हे सेक्सी यू’ असे लिहिले आहे. त्यावर ऋतुजाने हसत ‘धन्यवाद’ अशी कमेंट केली आहे. तिने दोन वेळा त्याच्या या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर ओंकारने ऋतुजाला ‘दोन वेळा धन्यवाद बोललीस, त्याबद्दल दोन वेळा तुझे आभार’, अशी कमेंट केली आहे. त्यावर ऋतुजाने ‘मग हे धन्यवाद नेटवर्कला म्हणं’, असे म्हटले आहे.

यावर ओंकारने ऋतुजा ‘तुझं माझं नेटवर्क गं!!’ अशी कमेंट केली आहे. त्यावर ऋतुजाने ‘सर्व्हर डाऊन आहे’, असे उत्तर त्याला दिले आहे. त्यावर ओंकारने ‘डाऊन असलेलं सर्व्हर देखील चांगली रेंज देतंय ग!!’ असं म्हणत हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. यानंतर ऋतुजाने ‘तू जिंकलास’ अशी कमेंट करत हात जोडल्याचा इमोजी पोस्ट केला आहे. ओंकार आणि ऋतुजा यांच्यात झालेल्या या संभाषणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

onkar raut comment 1
ओंकार राऊतची कमेंट

आणखी वाचा : “ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहतोय…” आस्ताद काळेच्या कमेंटने वेधलं लक्ष, ‘हास्यजत्रे’तील अभिनेत्री म्हणाली “काय तुम्ही…”

दरम्यान ऋतुजा बागवेने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री मानसी नाईक हिने तिच्या फोटोवर चेरी असा उल्लेख करत कमेंट केली आहे. तर अश्विनी कासारने मस्त, खूपच मस्त अशी कमेंट केली आहे. तिचा हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 08:51 IST

संबंधित बातम्या