मराठी अभिनेत्री व कवयित्री शमा निनावे (Shama Ninawe Daughter) यांनी लेकीच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. शमा निनावे यांची लेक कनीनिका निनावे ही विद्यापीठात पहिली आहे. शमा यांनी लेकीबरोबरचा एक फोटो पोस्ट करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली.
शमा निनावे यांची लेक कनीनिका ही एम. फिल परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तम गुण मिळवून युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली आहे. कनीनिका निनावे ही क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट आहे, तसेच ती भरतनाट्यममध्येही निपुण आहे. कनीनिकाचं लग्न झालं आहे, तिला ५ वर्षांची मुलगी आहे. घर, संसार आणि शिक्षण असं सगळं सांभाळून तिने ही कामगिरी केल्याने शमा यांना लेकीचं विशेष कौतुक आहे.
शमा निनावे यांची पोस्ट
Hurray!!!
It’s time for celebration ???
कनीनिका,
आमच्या डोळ्यांतली बाहुली !
एम. फिल च्या परिक्षेत प्रथम श्रेणी, विशेष प्रावीण्य मिळवून युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली !!
(1st class 1st with distinction)
घर कांदिवली ठाकूर विलेज ते विद्यापीठ पनवेल असा कमीत कमी दोन तास ते साडेतीन तास प्रवास, घर, संसार, पाच वर्षांची चिमुरडी आणि त्यात आलेल्या
अनेक अडचणी, कठीण प्रसंगांना हसतमुखाने सामोरे जाऊन, त्यांवर मात करून, अत्यंत जिद्दीने आणि पराकोटीच्या चिकाटीने तू मिळवलेल्या सफलतेचं, दैदीप्यमान यशाचं कौतुक करायला शब्दच सुचत नाहियेत मला.
तुझा किती किती अभिमान वाटतो म्हणून सांगू….
पुढच्या आयुष्यातही, नेहेमीच यशवंत, किर्तीवंत, नामवंत होशील याची खात्री आहे.
खूप खूप शुभेच्छा, आशिर्वाद, आणि प्रेम, अशी पोस्ट शमा निनावे यांनी केली आहे.
शमा यांच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कनीनिकाचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिनेही शमा यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. अभिनंद कनीनिका ताई, तुझा अभिमान वाटतो, असं तिने लिहिलं आहे.
शमा निनावे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी ‘पुन्हा कर्तव्य आहे’सह ‘कॅम्पस’, सांजभूल, अल्बम,आभाळमाया, शुभमंगल सावधान, पिंपळपान, घरोघरी, दामिनी, कॉमेडी डॉट कॉम, तिसरा डोळा, हॅण्डल विथ केअर, निदान,आवाज, मनुष्यदेवता, रेशीमगाठी, प्रेमभेट या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर त्या कवयित्रीदेखील आहेत. ‘शमा…साठी’ नावाचा त्यांचा निवडक कवितांचा कवितासंग्रह काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाला.