‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेनंतर ती कुठल्याही मालिकेत झळकली नव्हती. बऱ्याच काळ ती अभिनय क्षेत्रापासून दूर होती. पण आता या ब्रेकअप तेजश्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – लग्न कधी करतोयस? या प्रश्नावर शिव ठाकरे म्हणाला, “खरंतर…”

तेजश्रीला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतं आहे. यादरम्यान अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘प्रेमाची गोष्ट’च्या सेटवर तेजश्रीबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्याने केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक, फोटो शेअर करत म्हणाला…

‘राजश्री मराठी’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना मालिकेच्या सेटवरील तेजश्रीबरोबरच्या नात्याविषयी शुभांगी गोखले यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, “ती (तेजश्री) खूप खुल्या मनाची आहे. कामाच्याबाबतीत ती खूप निष्ठावान आहे. तिचा अनुभव खूप जास्त आहे. त्यामुळे तो बालिशपणा असतो ना की, शूटिंग आले, मस्ती केली, संपूर्ण सेटवर फिरणे, मग इकडे बस, तिकडे बस, याचे गाल ओढ, त्याचे गाल ओढ किंवा लाडात बोलणं असं काहीच तिचं नसतं.

हेही वाचा – ‘रॉनी और रानी…’च्या रिमेकमध्ये ३५ वर्षांनी धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या जागी कोणाला घेशील? ‘ही’ नावं घेत करण जोहर म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे शुभांगी म्हणाल्या की, “ती खूप तटस्थ आहे. ती खूप छान आहे. चांगला सीन करणे, हे तिचं ध्येय असतं. जे माझंही कायम ध्येय असतं. सेटवर आल्यावर बाकी खूप गोष्टी आहेत. मी खूप मज्जा केली, हे महत्त्वाचं नाहीये. तुम्ही आधी सीन चांगले करा. मग सीन मागचा विचार करा. याबाबतीत आमचं बरोबर जमलंय. आम्ही दोघी सेटवर एका ठिकाणी शांत बसलो असेल तर असं नसतं की, या का बोलतं नाही वगैरे. सगळ्यांना माहित असतं की, या काहीतरी विचार करत असतील. तेजश्री खूप गोड आहे आणि आपल्या कामाशी खूप प्रामाणिक आहे.”