लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित झी मराठीवर सुरु असलेली ‘लोकमान्य’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीश दातेने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या निमित्ताने स्पृहाने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

‘लोकमान्य’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच शंभर भाग पूर्ण केले. पण आता टीआरपी अभावी झी मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेच्या जागी नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा : “केसांचा लाल रंग, A अक्षराचे मंगळसूत्र अन्…”, ‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांच्या लूकची रंगली चर्चा, डिझाईनर म्हणाली…

लोकमान्य मालिका बंद होणार असल्याने आता स्पृहाने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. याबरोबरच तिने टीमसह मालिकेचे आभार मानले आहे.

स्पृहा जोशीची पोस्ट

“माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप आभार, भामे..

स्वप्नात स्वप्न.. भासात भास
सुवर्ण मृग.. अलगद फास
नाटकात नाटक.. तळ्यात चंद्र
वारा झपताल.. सप्तक मंद्र
पायी पैंजण.. भवताल कुंपण
तुझ्यात मी.. माझ्यात तू …
अमर्याद एकटेपण.. !!” अशी पोस्ट स्पृहाने केली आहे.

आणखी वाचा : “माझा प्रयोग होता अन्…” वंदना गुप्तेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यात घुसवलेली गाडी; म्हणाल्या “त्यांचे सुरक्षारक्षक…”

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पृहाच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर, तन्वी पालव, गौरी नलावडे, अक्षया नाईक या कलाकारांनी हार्ट इमोजी शेअर केला आहे.