‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन आता मराठी संगीतविश्वातील एक लोकप्रिय जोडी झाली आहे. दोघांचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी श्रोते नेहमी त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी करतात. नुकतीच प्रथमेश-मुग्धा यांची पुण्यात मैफल झाली. या सुरेल मैफलचा छोटा व्हिडीओ प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

प्रथमेश लघाटेने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आमच्या नुकत्याच झालेल्या पुण्यातील मैफलीतील भैरवी रागाची झलक.” या व्हिडीओत, प्रथमेश, मुग्धा दोघेही गाताना दिसत आहेत. दोघांचा सुरेल आवाज ऐकून उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: रणबीर-आलियाच्या लेकीच्या ‘या’ व्हिडीओनं सगळ्यांचं वेधलं लक्ष, पाहा राहा कपूरचा क्यूट अंदाज

प्रथमेश-मुग्धाच्या या व्हिडीओवर अभिनेत्री सुकन्या मोनेंसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे, “किती छान! उर भरून आला.” यावर मुग्धाने सुकन्या यांचे आभार मानत प्रतिक्रिया दिली की, “मावशी धन्यवाद.” तसंच “खूपच छान. मन तृप्त झाले”, “ही मैफल आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर होती. प्रथमेश-मुग्धा खूप खूप मनापासून आभार”, “अप्रतिम. मंत्रमुग्ध”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – कुशल बद्रिकेला बायकोनं लावलं कामाला, फोटो शेअर करत म्हणाला, “एका भांडणात….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अलीकडेच रामनवमीला मुग्धाचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीस आलं. ‘राघवा रघुनंदना’ असं गाण्याचं नाव असून श्रोत्यांचा या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.