अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी फोटो तर कधी डान्स व्हिडीओ शेअर करत असते. यामुळे अनेकदा ट्रोलही होते. पण, ट्रोलर्सना विशाखा सुभेदार सडेतोड उत्तर देते. शिवाय आजूबाजूच्या घडामोडींबाबतही अभिनेत्री परखड भाष्य करत असते. नुकतीच विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘टेलिव्हिजन डे’ निमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. तिने आजवरच्या प्रवासाचं थोडक्यात वर्णन केलं आहे. तसंच विशाखाने आतापर्यंत तिने साकारलेल्या विविधांगी भूमिकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, “तू मला सगळं काही दिलंस…ओळख, नाव, पैसे, प्रसिद्धी, आणि वेगवेगळ्या भूमिका…तुझ्याबरोबरचा प्रवास हा कायमच मी ‘मला’ शोधण्यात घालवते. फक्त ‘नजरेने’ काय करता येईल..? वाक्य कशी फेकावी म्हणजे तुझ्या समोर बसलेला प्रेक्षक ‘वाह’ म्हणेल. हा खेळ आम्हा कलाकारांचा कायमच सुरू असतो.”

हेही वाचा – फुलांची सुंदर सजावट, पंचपक्वान्न, आहेर अन्….; मराठी कलाकारांनी रेश्मा शिंदेचं ‘असं’ केलं केळवण, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

पुढे विशाखा सुभेदारने लिहिलं, “तुझी मेमरी म्हणे शॉर्ट टर्म असते पण खरं सांगू, मी तुझ्या साक्षीने अनेक वर्षांपूर्वी मारलेली cartwheel अजून लोकांच्या ध्यानात आहे. माझ्याकडून साकारल्या गेलेल्या ‘फूबाईफू’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विविध व्यक्तीरेखा, ‘शेजारी शेजारी’मधील ‘लज्जो’, ‘आंबट गोड’मधली ‘दया’ असो किंवा ‘का रे दुरावा’मधली ‘नंदिनी’ असो अजून अनेकांच्या स्मरणात आहे आणि आता ‘शुभविवाह’मधली ‘रागिणी’ किती खेळ खेळले आहेत आणि आजही खेळतेय मी तुझ्या साक्षीने.”

“टीव्ही बाबा, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आमच्या असण्याला, जगण्याला तुझा आधार आहे. आजवर या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला हा प्रवास साधण्याची संधी दिली त्या त्या सगळ्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, सहप्रवाश्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद…आणि तुझ्यावर प्रचंड प्रेम होतं आहे आणि यापुढेही तसंच राहील. जागतिक दूरचित्रवाणी दिवसाच्या म्हणजेच वर्ल्ड टेलिव्हिजन डेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा,” असं विशाखाने लिहिलं आहे.

हेही वाचा – “लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

हेही वाचा – “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने साकारलेली खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. याशिवाय तिचा नुकताच ‘पाणीपुरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.