स्टार प्रवाह’वरील सर्वच मालिका या कायमच चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकारही प्रसिद्धीझोतात आल्याचे पाहायला मिळते. याच वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकरचा अपघात झाला आहे. यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

विजय आंदळकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने त्याचा अपघात झाल्याचे सांगितले आहे. यावेळी त्याने त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या हाताला खरचटल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “ती की तो….?” ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील अभिनेता होणार बाबा

मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा नेहमीप्रमाणे शूटींग संपवून आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या गाडीला अपघात झाला. यात त्याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या हाताला खरचटले आहे. तसेच त्याच्या शरीराच्या इतर ठिकाणीही त्याला मार लागला आहे. विजयची अपघाताची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांनी तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा : “आता दोन-दोन पोरी भेटल्यात तरी…” प्रदीपच्या रडण्याच्या व्हिडीओवर मानसी नाईक स्पष्टच बोलली

या अपघातातून विजय सुखरूप बचावला असला तरी काही दिवस डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो काही दिवस मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेता विजय आंदळकर हा पिंकीचा विजय असो या मालिकेत युवराज या भूमिकेत दिसून येत आहे. या मालिकेत विजयने साकारलेल्या युवराज या भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे. त्याचा रावडीपणा आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना आवडत आहे. या आधी त्याने​ ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केले होते.