scorecardresearch

Premium

मुग्धा वैशंपायनच्या बहिणीचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, गायिका म्हणाली, “जीजूचा कान पिळताना आम्ही…”

अलिबागचे प्रसिद्ध जोगळेकर फार्मचे विश्वजीत जोगळेकरबरोबर मुग्धाची मोठी बहीण अडकली लग्नबंधनात

marathi singer Mugdha Vaishampayan Elder sister mrudul Vaishampayan wedding
मुग्धा वैशंपायनच्या बहिणीचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, गायिका म्हणाली, "जीजूचा कान पिळताना आम्ही…"

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. नुकताच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी मुग्धा आणि प्रथमेश लघाटेने प्रेमाची कबुली दिली होती. दोघांनी एक फोटो शेअर करून ‘आमचं ठरलंय’ असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हापासून दोघं चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुग्धा आणि प्रथमेशने गुपचूप साखरपुडा केला. त्यामुळे आता दोघं लग्न कधी करतायत? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण त्यापूर्वी मुग्धाची मोठी बहीण मृदुल वैशंपायन लग्नबंधनात अडकली आहे.

shah rukh khan and gauri khan had three wedding ceremonies
शाहरुख व गौरी खानने तीन पद्धतीने केलं होतं लग्न, प्रसिद्ध निर्मात्यांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “त्यांच्या लग्नात…”
actress was in love with ravindra mahajani
लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”
Ravindra Jadeja wife Rivaba
“माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करू नका”, रवींद्र जडेजाने वडिलांना सुनावलं, नेमकं प्रकरण काय?
Nitin Gadkari Shares Secret Pune Special Batata Wada Recipe In Video Says I Can Eat Three At A time Perfect Crisp With Garlic
Video: नितीन गडकरींनी सांगितली पुण्यातील प्रसिद्ध वड्याची रेसिपी करा ट्राय; म्हणाले, “मी ३ मोठे वडे खाऊ शकतो”

हेही वाचा – हेमंत ढोमे क्षिती जोगला ‘पाटलीण’ या नावाने का हाक मारतो? खुलासा करत म्हणाला, “लग्नानंतर…”

मृदुल वैशंपायन हिने विश्वजीत जोगळेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. तिच्या मेहंदी, हळद आणि लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. लग्नात मुग्धाच्या बहिणीने खास पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा शेला तिने घेतला होता. या लूकमध्ये मृदुलाचं सौंदर्य चांगलंच खुललं होतं. मृदुलच्या पतीने लाल रंगाचे सोवळं आणि उपर्ण परिधान केलं होतं.

काही तासांपूर्वी मुग्धाने जीजूचा कान पिळतानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये वैशंपायन भावंड मृदुलाच्या नवऱ्याचा कान पिळताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत मुग्धाने लिहिलं आहे, “जीजचा कान पिळताना आम्ही वैशंपायन भावंड. माझी खात्री आहे, हे कान पिळणं कायम लक्षात राहणारे जीजच्या आणि सगळ्यांच्याच…” मुग्धाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिच्या मोठ्या बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी उपेंद्र लिमयेंनी दिलेला नकार; किस्सा सांगत म्हणाले, “संदीप रेड्डी वांगाने स्वत:हून मला…”

दरम्यान, मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धा कधी लग्नबंधनात अडकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रथमेश आणि मुग्धाचा साखरपुडा पार पडला असल्यामुळे दोघं लवकरच लग्न करतील, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi singer mugdha vaishampayan elder sister mrudul vaishampayan wedding pps

First published on: 09-12-2023 at 10:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×