scorecardresearch

Premium

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी उपेंद्र लिमयेंनी दिलेला नकार; किस्सा सांगत म्हणाले, “संदीप रेड्डी वांगाने स्वत:हून मला…”

“‘अ‍ॅनिमल’साठी मी नकार दिलेला पण…”, उपेंद्र लिमयेंनी केला खुलासा; म्हणाले…

upendra limaye talks about his role in animal movie
उपेंद्र लिमयेंनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटात साकारली महत्त्वाची भूमिका

बॉलीवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका, तृप्ती डिमरी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर चित्रपटातील मुख्य अभिनेत्यांप्रमाणे मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांची प्रचंड चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. उपेंद्र यांच्या एन्ट्रीला सिनेमागृहात एक वेगळाच माहोल होतो. सगळीकडे त्यांनी साकालेल्या फ्रेडी पाटील या भूमिकेचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील भूमिकेसाठी उपेंद्र लिमयेंनी सुरूवातीला नकार कळवला होता. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबद्दल सांगताना उपेंद्र लिमये म्हणाले, “गेल्यावर्षी डिसेंबर (२०२२) महिन्यात मी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर संदीपचा जो सहकारी आहे जितेंद्र भोसले तो मला मार्च (२०२२) महिन्यापासून या चित्रपटासाठी फोन करत होता. तो मला म्हणाला, रणबीरबरोबर एक आम्ही चित्रपट करतोय त्यामुळे सरांची अशी खूप इच्छा आहे त्यामधील एक सीन तुम्ही करावा. माझं असं झालं नाही रे…एका सीनसाठी कुठे करु… म्हणून हा चित्रपट नाहीच करायचा असं मी डोक्यात ठरवलंच होतं. पण, तो जितेंद्र शेवटपर्यंत माझ्या लागला होता. शेवटी संदीपने मला स्वत: फोन केला पण त्यावेळी माझ्या फोनला रेंज नव्हती. त्यांनी मेसेज करुन भेटायला तरी या असा निरोप दिला होता.”

tejashwi yadav nitish kumar
“लिहून घ्या, २०२४ मध्ये नितीश कुमारांचा पक्ष…”, तेजस्वी यादवांचा मोठा दावा; म्हणाले, “खरा खेळ…”
Nawazuddin Siddiqui revealed earnings bollywood actors interview unfiltered samdish bollywood news
चित्रपटांसाठी कलाकारांना किती मानधन मिळतं? नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितली आकडेवारी, म्हणाला, “कधी ते…”
Ram Lalla Murti Has Changed Ayodhya Ram Mandir Arun Yogiraj Reaction Says This is Not My Work How Krishna Sheela Was Carved
“रामलल्ला बदलले, हे माझे काम नाही..”, मूर्तिकार अरुण योगीराज यांची माहिती, म्हणाले, “मूर्ती तयार झाली त्यावेळेस..”
sanjay-leela-bhansali-padmavat
“माझ्या मुलाच्या…” ‘पद्मावत’ला झालेला विरोध पाहून अशी होती भन्साळींच्या आईची प्रतिक्रीया; दिग्दर्शकाने सांगितली आठवण

हेही वाचा : सोनाली खरेच्या वाढदिवसाला मराठी कलाकारांची मांदियाळी! अभिनेत्रीने ‘या’ तीन जणांना केलं मिस, पाहा Inside फोटो

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “अर्जुन रेड्डीमुळे मी संदीपचं काम पाहिलं होतं. तो एक उत्तम दिग्दर्शक आहे त्यामुळे अशा माणसाला एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार मी केला. आमची भेट झाल्यावर संदीपने मला संपूर्ण कथा ऐकवली. त्याने डोक्यात लहान-लहान गोष्टींची तयारी करुन ठेवली होती. माझे गुगलवरुन फोटो काढून माझा लूक काय असेल हे सुद्धा त्याने आधीच ठरवलं होतं. कारण, त्याने यापूर्वी माझं काम पाहिलेलं होतं.”

हेही वाचा : “दोघांच्या घरातून ठळक विरोध…”, ‘अशी’ जमली शिवानी सुर्वे अन् अजिंक्यची जोडी; अभिनेत्री म्हणाली, “त्याचे बाबा…”

“संदीपने तयार केलेल्या लूकमध्ये फ्रेडीला मिशी नव्हती. त्यावेळी मी दुसऱ्या एका चित्रपटामध्ये काम करत होतो. त्यामुळे माझे केस आणि मिशी मी कापू शकत नाही असं मी त्याला सांगितलं. मी ठेवलेल्या अटीप्रमाणे तो नवीन लूक डिझाइन करायला तयार होता. फक्त तू हे काम कर हा एकच त्याचा हट्ट होता. तू नाही म्हणू नकोस…तू काम केलंस तर मला खूप आवडेल असं संदीपने मला जाता जाता सांगितलं. शेवटी मग सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी चित्रपटासाठी होकार कळवला.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upendra limaye talks about his role in animal movie and director sandeep reddy vanga sva 00

First published on: 08-12-2023 at 16:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×