Marathi Actress Amruta Pawar : ‘झी मराठी’ वाहिनीवर २०२१ मध्ये ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार आणि हार्दिक जोशी म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका ‘राणादा’ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री अमृता पवार वैयक्तिक आयुष्यात जुलै २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकली. आता लग्नाला अडीच वर्षे झाल्यावर अमृताने सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

अमृता पवारने २०२२ मध्ये नील पाटीलशी लग्न केलं. तिचा पती सिनेविश्वापासून दूर असून व्यवसायाने इंजिनीअर आहे. या जोडप्याने लग्नाला अडीच वर्षे झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अमृता आणि नील लवकरच आई-बाबा होणार आहेत. “Baby on the way” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे. एस्केलेटरवर सुरुवातीला अभिनेत्री व तिच्या नवऱ्याच्या चपला असतात मग, काही वेळाने लहान बाळाचे शूज येतात असा हटके व्हिडीओ शेअर करत अमृताने प्रेग्नन्सीची बातमी सर्वांना सांगितली आहे.

अमृताचं डोहाळेजेवण सुद्धा नुकतंच पार पडलं आहे. हिरव्या रंगाची सुंदर साडी, त्यावर फुलांचे दागिने या लूकमध्ये अभिनेत्री डोहाळेजेवणासाठी तयार झाली होती. तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी या डोहाळेजेवणासाठी उपस्थिती लावली होती. याशिवाय अमृतावर मनोरंजन विश्वातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. सुपर्णा श्याम, स्मिता शेवाळे, कोमल शेटे यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
amruta pawar
अमृता पवारचं पार पडलं डोहाळेजेवण ( amruta pawar )

अमृताने आतापर्यंत ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेसह ‘पाहिले मी तुला’, ‘सीनिअर सिटीजन’, ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ अशा मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘स्टार प्रवाह’च्या दुहेरी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अमृता एका सीएकडे लेखापाल म्हणून काम करत होती.