सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ज्यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती बसतो, त्यांनी बाप्पाचं विसर्जन केलं आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींकडेही गणपती बाप्पाचं आगमन होतो. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परी म्हणजे बालकलाकार मायरा वैकुळच्या घरीही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल

पाच दिवसांनी बाप्पांना निरोप देताना मायरा वैकुळला रडू कोसळलं. मायराच्या इन्स्टाग्रामवर बाप्पाच्या आगमनापासून ते त्यांच्या विसर्जनापर्यंतचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आलेत. त्यात विसर्जनाच्या व्हिडीओत मायरा रडताना दिसत आहे. “देवबप्पा, का रे सोडून गेलास मला? रागावलास का माझ्यावर? खरं सांगू आता तुझी खूप आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप मोदक व लाडू खाऊ घालेन, पण तू लवकर ये, मी तुझी वाट बघतेय” असं ती व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मायरा सध्या ‘निरजा एक नई पेहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. मायरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिच्या अकाउंटवरून तिचे अनेक व्हिडीओ व फोटो शेअर केले जातात. नुकतंच तिने ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर चिमुकल्या साईराज केंद्रेबरोबर डान्सही केला होता.