झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका आजही सातत्याने चर्चेत असतात. याच यादीतील एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत मिनाक्षी वहिनी हे पात्र अभिनेत्री स्वाती देवलने साकारले होते. अभिनेत्री स्वाती देवलने नुकतंच तिच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

स्वाती देवल ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध गोष्टींवर भाष्य करत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर तिचा मुलगा स्वराध्य याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट, फोटो पोस्ट करत म्हणाली…

स्वाती देवलची पोस्ट

“पहाटे माझ्या हातात एक छोटंसं बाळ माझ्या आधी गालावर आणि मग हातात तुला dr नी दिलं.. ते छोटंसं रूप अजूनही डोळ्यात आहे साठवलेले.. तू ही माझ्याशी ओळख पटवायचा प्रयत्न करतं होतास.. हि आपुलकी ने जवळ घेणारी बाई कोण? हिच्या कुशीत गेल्यावर मी का रडायचा थांबतो तुला कळत न्हवत.. एवढीशी नाजूक मूर्ती पाहून तुला हाताळताना भीती वाटत होती. फार साजिर रूप, तेज .. माझ्या स्वामी आबाचं पिल्लू, बाळ.

बाबा तर airport वर उतरला आणि त्याला मुलगा झाला कळल्यावर हातात येईल ती नोट रिक्षा वाल्याला देऊन म्हणाला;” यार अभी बाप बना मैं.. चल भगा रिक्षा बच्चे को देखना है.. आणि तुला पाहिल्यावर थबकला..किती वेगळा अनुभव, आनंद तू दिलास …अचानक खूप जण तुला मी मामा, मामी, आजी, आजोबा अशी नाती सांगून गेले.तर तू त्यांना जीभ बाहेर काढून वेडवलास..आम्ही हसलो.. खुप लिहायचे आहे.but ok..

तूझ्या जीवनात ही खुप आनंद, यश, प्रेम, कीर्ती, चांगलं आरोग्य तुला मिळो.. सगळ्या वाईट गोष्टी, वाईट विचार, माणसे ह्यांच्यापासून स्वामी तुला नक्की दूर ठेवतील.. माझा विश्वास आहे.. तू चांगला माणूस हो.. आमचे अनुभव,संस्कार , आशिर्वाद तूझ्या बरोबर कायम राहतील… बाळा i love u….”, असे स्वाती देवलने म्हटले आहे.

आणखी वाचा : प्रियदर्शनी इंदलकरला शरद पोंक्षेंच्या हस्ते मिळाला महत्त्वाचा पुरस्कार, म्हणाली “अशी प्रोत्साहनाची थाप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान स्वाती देवल ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मिनाक्षी वहिनी हे पात्र साकारलं होतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल हा तिचा पती आहे.