रसिका सुनील मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून ती प्रसिद्धी झोतात आली. रसिकाच्या खासगी आयुष्याची कायमच चर्चा होताना दिसते. नुकत्याच एका मुलाखतीत रसिकाने तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “सुंदरा मनामध्ये भरली मालिकेसाठी किती मानधन मिळालं?” अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, म्हणाली…

shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

रसिका सुनीलचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. एका मुलाखतीत रसिकाला तिच्या लव्ह लाईफबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तू कधी कुणाला प्रपोज केलं आहेस का? असा प्रश्न रसिकाला विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना रसिका म्हणाली, “हो मी दुसरीत असताना एका मुलाला प्रपोज केलं होतं. मला आता त्याचं नाव आठवत नाही पण मी खोडरबरवर आय लव्ह यू लिहून त्याला दिलं होतं.”

रसिकाच्या कामाबाबत बोलायचं झाल तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून ती घराघरात पोहचली. काही महिन्यांपूर्वी तिचं ‘Diet लग्न’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकात रसिकाबरोबर सिद्धार्थ बोडकेची प्रमुख भूमिका होती. तसेच २ जूनला तिचा ‘फकाट’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रसिकाव्यतरिक्त हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. आता रसिका ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय गाण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.