अभिनेत्री मीनाक्षी राठोड ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत ती देवकीची भूमिका सकारायची. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या मालिकेला प्रेक्षक उत्कृष्ट प्रतिसाद देत असतानाच गरोदरपणामुळे मीनाक्षी या मालिकेतून बाहेर पडली होती. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मीनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी ती चाहत्यांची शेअर करत असते. गरोदरपणात तिने केलेलं प्रेग्नन्सी फोटोशूटही खूप चर्चेत आलं होतं. मे महिन्यात तिला कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर जवळपास आठ महिने ती तिच्या लेकीला वेळ देत होती. आता बाळाच्या जन्माच्या आठ महिन्यानंतर ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

आणखी वाचा : प्रसाद ओक अचानक नाटकाच्या प्रयोगाला आला अन्…; संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला गमतीशीर किस्सा

मीनाक्षीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केलं. या रीलमध्ये ती एका शूटिंग सेटवर दिसत असून तिच्या हातामध्ये स्क्रिप्ट दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “लो फिर आगये हम, स्वागत नहीं करोगे.(कब कहाँ जल्द ही बतायेंगे)” तिची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या पुनरागमनाबद्दल उत्सुकता दाखवली आहे.

हेही वाचा : “तू वाघीण आहेस…”, अभिनेत्री मिनाक्षी राठोडचे बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीनाक्षीला मे महिन्यात मुलगी झाली. मीनाक्षी आणि तिचा पती कैलास सोशल मीडियावरून त्यांच्या लेकीचे गोड फोटो शेअर करत असतात. त्यांच्या लेकीचं नाव आहे यारा. त्यामुळे आता मीनाक्षी कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.