मराठमोळा शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात दिसतोय. शिव या आठवड्यात राजा बनला असून यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा कॅप्टन बनणारा तो एकमेव स्पर्धक आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्या पर्वात त्याच्यासह अभिनेत्री वीणा जगतापदेखील सहभागी झाली होती. शोमध्येच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ‘बिग बॉस मराठी २’ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजले होते. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दरम्यान, बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही शिव-वीणा रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली.

हेही वाचा – “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

वीणाला शिवबद्दल विचारलं असता ती चिडल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे दोघांचंही नातं संपुष्टात आलंय, यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने शिव व वीणाच्या नात्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मेघाने नुकतीच ‘टेली चक्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने शिवच्या गेमबद्दल, त्याचं अर्चनाशी झालेलं भांडण यासह वीणासोबतच्या नात्याबद्दलही भाष्य केलं.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेधा म्हणाली, “मराठी बिग बॉसमध्ये शिवला वीणा आवडली होती. तर, त्याने त्याचं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं होतं. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही त्यांचं नातं खूप चांगलं राहिलंय. अजूनही त्यांचं नात एका टप्प्यावर आहे. पण त्याबद्दल मी बोलणार नाही. शिव घराबाहेर आल्यानंतर तुम्ही त्याला त्याबद्दल विचारू शकता. त्या दोघांनाही जेव्हा एकमेकांची गरज असते, तेव्हा दोघेही एकमेकांसाठी हजर असतात. शिव टीव्हीवर दिसण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी नाती जोडणारा नाही. बिग बॉस संपल्यानंतरही घरातल्या लोकांशी त्याची मैत्री टिकून राहील”, अशा शब्दांत मेघाने शिवचं कौतुक केलं.