अभिनय इंडस्ट्रीमध्ये नवख्या कलाकारांना काम मिळवण्यात अनेकदा अडचणी येतात. त्यांना चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा त्यांना कास्टिंग काउचचा सामनाही करावा लागतो. काम देण्याच्या बहाण्याने अत्याचाराच्या घटनाही घडतात. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या सूनेने तिचा कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला होता.

“तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या सूनेचे नाव मदालसा शर्मा आहे. सध्या ती ‘अनुपमा’ मालिकेत काव्या नावाची भूमिका साकारत आहे. ती प्रामुख्याने टीव्ही मालिकांमध्ये काम करते. मदालसाने जेव्हा टीव्ही विश्वात प्रवेश केला होता, तेव्हा तिलाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. तिच्या संघर्षातील दिवसांचा अनुभव फार चांगला नव्हता.

अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

मदालसा शर्माने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये धोका असतो. “मुलगा असो की मुलगी, सर्वांनाच समस्यांना सामोरं जावं लागतं. इंडस्ट्री कुठलीही असो, स्त्रियांभोवती नेहमीच पुरुष असतात. अनेकवेळा अशी परिस्थिती देखील येते जेव्हा आपल्याला कंफर्टेबल वाटत नाही. जेव्हा जेव्हा माझ्यावर अशी परिस्थिती येते तेव्हा मी तिथून दूर जाते. चांगल्या आणि वाईट गोष्टी एकत्र चालत राहतात, पण तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही. लोक तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही हिंमत ठेवून ठाम राहायला हवं,” असं मदालसा म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक दशकाहून जास्त काळ अभिनय इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या मदालसा शर्माने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने २०१८मध्ये मिथून यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीशी लग्न केलं होतं.