खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे नेहमीच चर्चेत असतात. राजकीय, तसेच समाजिक विषयांवर अमोल कोल्हे आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंनी आतापर्यंत अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमधून निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुकही होतं. दरम्यान, एका नव्या व्हिडीओमुळे अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा- “मालिकेचं नाव बदला…”; गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहून प्रेक्षकांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “मुर्खपणाचा कळस…”

सोशल मीडियावर अमोल कोल्हे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. निरनिराळे व्हिडीओ फोटो पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. या व्हिडीओमध्ये एसटी बसमधून प्रवास करताना दिसत आहेत. एसटीमध्ये अमोल कोल्हेंनी प्रवाशांबरोबर गप्पा मारत, तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढत प्रवास केल्याचे बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत अमोल कोल्हेंनी लिहिले, “अनेक वर्षांनी आज लाल परीने प्रवास केला आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.”

अमोल कोल्हेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काहींनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत अमोल कोल्हेंचं कौतुक केलं आहे; तर काहींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा देखावा असल्याचं म्हणत ट्रोल केलं आहे. काही युजर्सनी अमोल कोल्हेंकडे मराठा आरक्षणासाठी लढा द्या, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा- “…आणि माझ्या आयुष्यात राजकुमार आला”, नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली, “त्याने मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल कोल्हे यांच्या मनोरंजनसृष्टीतील कामाबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत त्यांनी अनेक ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदा राजा शिवछत्रपती या मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप गाजली होती. त्यानंतर त्यांनी ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘वीर शिवाजी’ या मालिकांतही महाराजांची भूमिका साकारली होती. तसेच ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले होते.