बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता मोहित रैना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मोहित रैनाच्या खासगी आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. मोहितने वर्षांच्या सुरुवातील म्हणजेच जानेवारी २०२२मध्ये अदिती शर्माशी लग्न केलं होतं. पण आता या दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर मोहित रैनाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा आहे की त्याचे पत्नीबरोबर वाद सुरू असून त्यामुळे त्याने इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत. वर्षाच्या सुरुवातील मोहितने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती. पण आता मात्र त्याने लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. एवढंच नाही लग्नानंतर पत्नीबरोबर शेअर केलेले सगळेच फोटो त्याने डिलिट केले आहेत. त्यामुळे आता ही जोडी विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा-‘मुंबई डायरीस २६/११’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद; अभिनेता मोहित रैना म्हणला….

मोहित रैनाच्या इन्स्टाग्रामवर पत्नी अदितीसह एकच फोटो आहे. हा फोटो १ जून २०२२ ला पोस्ट केलेला आहे. या फोटोमध्ये मोहितने अदितीला खांद्यावर उचलून घेतलं आहे. या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “तुम्ही दोघं एकत्र फोटो का पोस्ट करत नाही. मी पाहिलं आहे की तुम्ही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत नाही आणि लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. काहीतरी बिनसलंय नक्कीच.” अर्थात सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर अदिती किंवा मोहितने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
mohit raina insatgram

दरम्यान मोहित रैनाने लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अदितीला भेटला होता. मोहितनेच अदितीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. त्याची ‘देवों के देव महादेव’ मालिका बरीच गाजली होती. या मालिकेनेच त्याला स्वतःची वेगळी ओळख दिली होती.