scorecardresearch

‘मुंबई डायरीस २६/११’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद; अभिनेता मोहित रैना म्हणला….

एका मुलाखतीत त्याने त्याचे मत व्यक्त केले आहे.

mohit-raina-1
(Photo-Mohit Raina Instagram)

टेलिव्हिजन विश्वात ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून शंकराची भूमिका साकारत अभिनेता मोहित रैना प्रेक्षकांच्या मने जिंकली आहेत. नंतर ‘उरी’ या चित्रपटमधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने मेजर करण कश्यप यांची भूमिका साकारली होती. सध्या मोहित त्याच्या अॅमेझोन प्राइमवरील ‘मुंबई डायरीज २६/११’ या वेब सीरिज साठी चांगलाच चर्चेत आहे.

मोहित रैनाच्या या सीरिजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  या विषयी ‘इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम’ शी गप्पा मारत असताना त्याने आपले मत मांडले आहे. मोहित जवळपास दोन दशकं या इंडस्ट्रीत काम करत आहे, मात्र अजूनही सकारात्मक प्रतिसाद पाहुन त्याचा आत्मविश्वास वाढतो असे त्याने सांगितले. तो म्हणाला, “तुमचा अंदाज दृष्टिकोन कधीही चुकू शकतो त्यामुळे समीक्षकांच्या अभिप्रायमुळे तुम्हाला खुप काही शिकायला मिळते.”  सोशल मीडियावरील अभिप्रायबद्दल बोलताना तो म्हणाला, “तुमचे चाहते तुमच्यावर इतके प्रेम करतात की ते तुम्ही जे काही काम करत आहात ते आनंदाने स्वीकारतील, त्यांना आवडले नाही तर ते तुम्हाला कळवतील, मात्र तुमच्यावर प्रेम करायचे सोडणार नाहीत.”

पुढे या सीरिज बद्दल बोलताना तो म्हणाला, “सुरूवातीला दिग्दर्शक निखिल आडवानीला वाटलं मी या सीरिजमध्ये काम करायला इच्छुक नाही, मात्र  जेव्हा मी पूर्ण कथानक ऐकलं तेव्हा मला ही सीरिज प्रचंड आवडली आणि मला ही संधी दिल्या बद्दल त्यांचे आभार मानतो.”

‘मुंबई डायरीज  २६/११’ ही सीरिज २६ डिसेंबर २०११ रोजी घडलेल्या थरारक अनुभवावर आधारित आहे. आठ भागांच्या या सीरिजच्या मध्ये त्या तीन दिवसात नक्की काय घडलं असेल? हे दाखविलेआहे, मात्र डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून.  त्या भयानक आतंकवादी हल्यावर आजवर अनेक चित्रपट आणि डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्या आहेत. मात्र त्या हल्ल्याच्या दिवशी डॉक्टर कोणत्या परिस्थितीत होते याचे उत्कृष्ट रित्या वर्णन दिग्दर्शक निखिल आडवाणीने या सीरिजमध्ये केले आहे. या सीरिजमध्ये मोहित रैना  व्यतिरिक्त कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, मृण्मयी देशपांडे, सत्याजीत दुबे आणि नताशा भारद्वाज प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 11:52 IST