This Television Actress Own Six Restaurants : अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायही करतात. काहींचे स्वत:चे रेस्टॉरंट आहेत, काहींचे कपड्यांचे ब्रँड्स आहेत; तर काहींनी इतर व्यवसायांत गुंतवणूक केली आहे. छोट्या पडद्यावरील अशाच एका अभिनेत्रीचाही स्वत:चा व्यवसाय असून ती तब्बल सहा रेस्टॉरंटची मालकीण आहे.
छोट्या पडद्यावरील ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’, ‘नागीन’, ‘देवों के देव महादेव’ यांसारख्या मालिकांमध्ये आणि काही बॉलीवूड चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. मौनी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तरीसुद्धा फक्त टेलिव्हिजनपुरतं मर्यादित न राहता तिनं चित्रपटांतही काम केलं आहे. त्यासह मौनीचा स्वत:चा व्यवसायही आहे.
मौनी रॉय आहे सहा रेस्टॉरंटची मालकीन
मौनी रॉयच्य बदमाश (Badmaash) या रेस्टोरंटची तब्बल सहा ब्रँचेस आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार मौनी रॉयने २०२३ मध्ये हा व्यवासाय सुरू केला होता. तिने बंगळुरू आणि मुंबईमध्ये बदमाश हे रेस्टॉरंट सुरू केलं आणि आता तिचे देशभरात एकून सहा रेस्टॉरंट्स आहेत. बदमाश रेस्टॉरंट्सची जंगल थीम असून तेथील इंटेरिअर डिझाइन लक्षवेधी आहे. मौनीच्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी ते मांसाहारी अशा विविध पदार्थांचा समावेश आहे, ज्यांची किंमत ३०० ते ८०० रुपयांपासून सुरू होते. साधं, पण तरीही चवदार अशा शाही तुकड्याची आणि गुलाब जामूनची किंमत ४१० रुपये इतकी आहे.
मौनीच्या रेस्टोरंटमध्ये ३९५ रुपयांना भेळ मिळते. तर, मसाला पापड, सेवपुरी यांची किंमत २९५ इतकी आहे. कांदा भजी ३५५ ला, तर तंदुरी रोटी १०५ रुपयांना आहे. मौनी तिच्या या व्यवसायाचं श्रेय तिचा नवरा सुरज नांबियार आणि त्याच्या मित्रांना देते की, त्यांच्यामुळे तिला या व्यवसायासाठी प्रेरणा मिळाली.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार मौनी रॉय म्हणाली, “मला भारतीय जेवण खूप आवडतं आणि मी कामानिमित्त खूप प्रवास करीत असते. त्यामुळे मी अनेकदा कुठे मला सर्वाधिक चांगलं आणि चविष्ट भारतीय जेवणाचा आस्वाद घेता येईल याच्या शोधात असते आणि मला असे वाटते की, बंगळुरू आणि मुंबईत आपल्याकडे चविष्ट भारतीय जेवण असणारी फार कमी ठिकाणं आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी एक उत्तम संधी होती.”
