Mrunal Dusanis New Restaurant : छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून मृणाल दुसानिसला घराघरांत ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री कलाविश्वापासून दूर होती. मात्र, यावर्षी मार्च महिन्यात मृणाल जवळपास चार वर्षांनी भारतात परतली, आता लवकरच ती मालिकाविश्वात पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. एका बाजूला घर, करिअर सांभाळून मृणालने नुकतंच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्री व तिचा पती नीरज मोरे यांनी ठाण्यात हॉटेल सुरू केलं आहे. हे हॉटेल सुरू करण्यामागचं कारण, याची संकल्पना आणि या नवरा-बायकोने मिळून पाहिलेलं स्वप्न याबद्दल मृणालने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना माहिती दिली आहे.

मृणाल सांगते, “आम्ही दोघांनी मिळून ठाण्यात ‘Belly Laughs बिस्त्रो अँड टॅप’ या नावाने आमचं स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. हे आमचं नवीन रेस्टॉरंट सर्वांना खूप आवडेल अशी खात्री आहे.”

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! ‘या’ अभिनेत्याच्या साथीने सुरू केला हटके व्यवसाय; पाहा झलक

एकत्र पाहिलेलं स्वप्न झालं साकार

बिझनेसची सुरुवात नेमकी कशी झाली याबद्दल सांगताना मृणालचा पती नीरज म्हणाला, “मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा मी एका कॅफेमध्ये नोकरी करत होतो. तेव्हाच डोक्यात कुठेतरी होतं की, स्वत:चं काहीतरी सुरू करायचं. त्यानंतर शिक्षण झालं, IT मध्ये जॉब झाला. या सगळ्यात १५ वर्षं गेली. त्यामुळे मनामध्ये ती इच्छा कायम होती. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मला मृणालची खूप मदत झाली. तिच्या मदतीमुळे हे सगळं उभं राहू शकलं.”

मृणाल ( mrunal dusanis ) पुढे म्हणाली, “हे आमचं दोघांचं स्वप्न होतं आणि या रेस्टॉरंटबाबत आमचं एकमत झालं. आम्हा दोघांची कायम फूड इंडस्ट्रीत काहीतरी करावं अशी इच्छा होती आणि ते स्वप्न आज साकार झालंय. आम्हाला हा नवीन प्रवास सुरू करताना अनेक लोकांची साथ मिळाली. आयुष्यात कोणतीच गोष्ट सोपी नसते. त्यात व्यवसाय करणं अजिबातच नाही. खूप मेहनत, प्रयत्न, रात्रीचं जागरण हे सगळं करून आमच्या छोट्याशा लेकीला सांभाळून आम्ही हा प्रवास सुरू करत आहोत.”

हेही वाचा : Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणालच्या ( mrunal dusanis ) नव्या हॉटेलचं उद्घाटन सोहळा १७ नोव्हेंबरला सायंकाळी पार पडला. यावेळी शर्मिष्ठा राऊत, वंदना गुप्ते, ज्ञानदा रामतीर्थकर, विदिषा म्हसकर, आकांक्षा गाडे अशा सगळ्या मंडळींनी तिच्या रेस्टॉरंटमध्ये उपस्थिती लावली होती.