आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी, सध्याची मराठी संगीतविश्वातील लाडकी जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले मुग्धा व प्रथमेशने गेल्या वर्षी २१ डिसेंबरला लग्न केलं. मराठी रिती-रिवाजानुसार पारंपरिक पद्धतीत दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाला आता पाच महिने पूर्ण झाले असून दोघं आता परदेशवारीवर आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दोघांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुग्धा व प्रथमेशच्या गायनाचे कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन हाऊसफुल्ल केले होते. यावेळी मुग्धा व प्रथमेशने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून श्रोत्यांचे आभार मानले होते. आता हे सर्व कार्यक्रम आटोपून दोघं लग्नाच्या पाच महिन्यांनंतर परदेशात फिरायला गेले आहेत.

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, पाहायला मिळाली मुख्य अभिनेत्रीची झलक

दोन दिवसांपूर्वी मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर कॉफी मग आणि पासपोर्टचे फोटो शेअर केले होते. ज्यावर लिहिलं होतं, “खूप गरजेचा आणि प्रतिक्षेत असलेल्या प्रवासाला जात आहोत. चला गाऊ.” त्यानंतर प्रथमेशने विमानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या हिमालयाचा फोटो शेअर केला. पण या इन्स्टाग्राम स्टोरीमधून स्पष्ट होतं नव्हतं की, मुग्धा व प्रथमेश नेमकं कुठे फिरायला गेलेत? पण काल, मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – गर्भवती असताना मराठी अभिनेत्रीला लागले बिअर प्यायचे डोहाळे! स्वतः खुलासा करत म्हणाली, “मी नऊ महिने बिअर अन्…”

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, पाहायला मिळाली मुख्य अभिनेत्रीची झलक

मुग्धाने काल, ७ जूनला निर्सगरम्य वातावरणाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता. आजूबाजूला हिरवळ आणि हॉटेल या फोटोमध्ये पाहायला मिळालं. या फोटोवर मुग्धाने लिहिलं होतं, “हे नेपाळ”. त्या खाली ‘हयात रीजन्सी काठमांडू’ असं लोकेशन तिनं टाकलं होतं. याचाच अर्थ लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मुग्धा व प्रथमेश नेपाळला फिरायला गेले आहेत.

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं. मग मुग्ध व प्रथमेशने २१ डिसेंबरला लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.