मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाले होते. याच मंचावर दोघांची पहिली ओळख झाली होती. पुढे, कार्यक्रम संपल्यावर अनेक वर्षांनी दोघेही एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले. यामुळे मुग्धा-प्रथमेशमध्ये चांगली मैत्री झाली. याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने लग्नगाठ बांधली.

मुग्धा – प्रथमेशच्या लग्नाला मराठी संगीतविश्वातील बऱ्याच मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. गेल्यावर्षी जून महिन्यात या दोघांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली देत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर मुग्धा-प्रथमेश आनंदाने सुखी संसार करत आहेत.

हेही वाचा : Video: शुभंकर तावडेला मिळाली बाबाकडून कौतुकाची थाप! मुलाच्या ‘कन्नी’ चित्रपटाच्या प्रिमिअरला सुनील तावडेंची हजेरी

मुग्धा अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त अंदमानला गेली होती. तिथून परत आल्यावर ती थेट रत्नागिरीत तिच्या सासरी आरवलीला पोहोचली आहे. यावेळी गायिकेच्या सासऱ्यांनी संपूर्ण कुटुंबीयांसाठी बटाटेबडे बनवले होते. याचे खास फोटो मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रथमेशचे बाबा गरमागरम बटाटेवडे तळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘नाच गं घुमा’चे मोशन पोस्टर प्रकाशित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
mugdha
मुग्धा वैशंपायन इन्स्टाग्राम स्टोरी

मुग्धाने या फोटोंना “आरवलीला आलं की उमेश काकांच्या हातचे बटाचेवडे खायचा वेगळाच आनंद” असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, गायिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मुग्धा-प्रथमेश नेहमीच परंपरा, संस्कृती जपत चाहत्यांचं मनोरंजन करत असल्याने या दोघांवर सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव केला जातो.