‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला होता. दोघांनीही पोस्ट करत आपल्या नात्याची कबूली दिली.

हेही वाचा- “तो खूप गुणी आहे पण…,” मुग्धा वैशंपायनने सांगितली प्रथमेश लघाटेमधील न आवडणारी गोष्ट

प्रथमेश आणि मुग्धाने आपल नात जाहीर केल्यानंतर चाहते आणखीनच उत्साहित झाले आहेत. मुग्धा आणि प्रथमेशची लव्ह स्टोरी नेमकी सुरु कशी झाली? कुणी कोणाला पहिलं प्रपोज केलं अशी अनेक प्रश्न चाहत्यांना पडली आहेत. नुकतचं प्रथमेश आणि मुग्धाने युट्यूब व्हिडिओमधून चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. सारेगमप’वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना कोणत्या नावाने काय हाक मारायचे? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. या प्रश्नावर मुग्धाने दिलेलं उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू येईल.

हेही वाचा- ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये स्टंट करताना ‘हा’ मराठमोळा स्पर्धेक जखमी; हाताच्या बोटाला पडले टाके

मुग्धा म्हणाली, “मला हे सांगायला खरंतर खूप मज्जा येत आहे कारण हे खूप मजेशीर आहे. मी याला सुरुवातील ‘प्रथमेश दादा’ म्हणायचे”. मुग्धाच्या या उत्तराला प्रथमेशनेही दुजारा दिला. प्रथमेश म्हणाला, “होय कार्तिकी सुद्धा मला प्रथमेश दादा म्हणायची. फक्त कार्तिकी नंतर प्रथमेशच म्हणायला लागली आणि मुग्धा थोडीशी उशिरा प्रथमेश म्हणायला लागली. पण मी हिला मुग्धाच म्हणायचो आणि कधीकधी आम्ही सगळेच हिला माऊ म्हणून हाक मारायचो.”

हेही वाचा- वयाच्या २३ व्या वर्षीच का लग्न करतीय? मुग्धा वैशंपायनने सांगितलं कारण, म्हणाली, “प्रथमेश…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चिच झालेली नाही. लग्न कधी करणार याबाबतही दोघांनी खुलासा केला आहे. लग्नाची तारीख अद्याप निश्चित झाली नसून यावर्षी लग्न करणार की पुढच्या वर्षी हे अजून ठरायचं असल्याचं ते म्हणाले. मात्र, असं असलं तरी दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी थमेश लघाटेचे पहिलं केळवण पार पडलं. या केळवणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.