तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४ सप्टेंबरला सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मुक्ता, सागर, सई, सावनी अशा अनेक व्यक्तिरेखा असलेल्या या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन घटना घडताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी सईने कालबाह्य झालेलं कप सिरप प्यायल्यामुळे तिच्यावर जीवघेणं संकट ओढावलं होतं. पण सुदैवाने मुक्ताचं लक्ष सईकडे गेलं. तिने तातडीने सईला रुग्णालयात दाखल केलं. यामुळे सईचा जीव वाचला. मात्र दुसऱ्याबाजूला गैरसमजातून सागरने मुक्ता विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यामुळे मुक्ताच्या साखपुड्याची तयारी सुरू असतानाच तिच्या घरी पोलीस दाखल झाले. त्यांनी गोखलेंच्या घराची झाडाझडती घेतली आणि यावेळी त्यांना कालबाह्य झालेल्या कप सिरपची बॉटल मुक्ताच्या कचऱ्याच्या डब्यात सापडली. यामुळे मुक्ताच्या आई-वडिलांना अटक केली. या सर्व प्रकारामुळे मुक्ताचा साखरपुडा मोडला.

हेही वाचा – Laxmikant Berde Birthday: मी आलो.. मी पाहिलं.. मी लढलो.. मी जिंकून घेतलं सारं

या सर्व नाट्यानंतर मुक्ता सईला रुग्णालयातून घेऊन घरी येते. त्यावेळी सर्वकाही सत्य समोर आलं. यानंतर सागरने मुक्ताविरोधातील अपहरणाची तक्रार मागे घेतली आणि तिचे आई-वडील तुरुंगातून सुटले. मग मालिकेत महानाट्य घडलं. सावनी सईला घेऊन तिच्या घरी गेली. अशातच आता सागर व सावणीच्या घटस्फोटाची आणि सईच्या कस्टडी सुनावणी पाहायला मिळणार आहे. तसेच पुढच्या भागात मुक्ताचा मुलं दत्तक घेण्याचा अर्ज नाकारला जाणार आहे. यासंबंधीचा व्हिडीओ ‘स्टार सीरियल मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’च्या सेटवर पूर्णा आजीला आली होती चक्कर, आईच्या आजारपणाबद्दल काय म्हणाली तेजस्विनी पंडित?

हेही वाचा – “२ वर्ष वडिलांना नोकरी नव्हती अन् आई…”, प्रार्थना बेहेरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महिन्याभरतच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. तेजश्री प्रधान व राज हंचनाळे व्यतिरिक्त शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.